Headlines

वैराग-मोहोळ सिमेंट रस्त्यावरील साईडपट्टीत भरला जातोय मुरूम, रस्त्याच्या कडेला फ्लेवर ब्लॉक बसवण्याची वैरागकरांनी केली मागणी




वैराग-मोहोळ राज्य मार्ग क्रमांक ७४ वरील वैराग शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी शहरातील काही भागांतील रस्ता, सिमेंट काँक्रिट रस्ता तसेच गटारींचे काम अद्याप अपूर्णच असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला फ्लेवर ब्लॉक बसविण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही हा भाग तसाच अपूर्ण ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वैरागकर नागरिकांकडून होत आहे. शहरातून जाणारा हा राज्य मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या काही भागांतील अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला सिमेंट रस्ता व गटारीचे काम पूर्ण झाले नसल्याने पादचारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. पावसाळ्यात या अपूर्ण भागात पाणी साचून चिखल निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक ठरू शकते. तर उन्हाळ्यात या भागात धुळीचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. रस्त्याच्या कडेला योग्य व्यवस्था नसल्याने दुकानांसमोर येणाऱ्या ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराला काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच रस्त्याच्या कडेला फ्लेवर ब्लॉक बसविणे, सिमेंट रस्ता आणि गटारींचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. केवळ मुख्य रस्ता पूर्ण करून चालणार नाही, तर शहरातील संपूर्ण रस्त्याचे काम दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांना आणखी किती दिवस या अर्धवट कामाचा त्रास सहन करावा लागणार, असा सवाल वैराग ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. कामाबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास नियमानुसार कार्यवाही करू मोहोळ-वैराग रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले असून, रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, वैराग शहरालगतचा काही भाग अद्याप अपूर्ण आहे. या भागातील उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच गटारीलगतच्या रस्त्याच्या कामाबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करून ते कामही पूर्ण केले जाईल. प्रवीण जोशी, प्रकल्प सल्लागार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *