Headlines

सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षण वारशाची शाळा बंद करू नका; पुनरुज्जीवन करा:अहमदनगर बोर्डिंग हायस्कूलसाठी मिस् सिंथिया फॅरार शाळा बचाव अभियान आक्रमक



क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अध्यापन प्रशिक्षणाशी आणि प्रेरणेशी संबंधित मिस् सिंथिया फॅरार यांच्या ऐतिहासिक शैक्षणिक कार्याचा वारसा लाभलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल फॉर गर्ल्स आणि अहमदनगर बोर्डिंग हायस्कूल या दोन ऐतिहासिक शाळा बंद करण्याच्या

.

अमेरिकन मराठी मिशनने १८२८ मध्ये महाराष्ट्रात शैक्षणिक कार्य सुरू केले. १८३८ मध्ये मुलींसाठी शाळेची स्थापना झाली. मिस् सिंथिया फॅरार यांनी अहमदनगरमध्ये स्त्रीशिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे १८८२ मध्ये अहमदनगर बोर्डिंग हायस्कूलची स्थापना झाली. या संस्था स्त्रीशिक्षण आणि आधुनिक शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.

दोन्ही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, शिक्षक समायोजन, वेतनाचे प्रश्न, घटती विद्यार्थीसंख्या आणि सुविधांचा अभाव यामुळे शैक्षणिक स्थिती खालावल्याचा आरोप अभियानाने केला आहे. शिक्षकांची उपलब्धता, प्रलंबित वेतन व भत्ते आणि सेवाविषयक कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली.

शाळा बंद करण्याची प्रक्रिया थांबवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, निवास, पोषण, डिजिटल शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या सुविधा निर्माण कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रेव्ह. जी.आर. वाघमारे, माजी विद्यार्थिनी संध्या मेढे, निवृत्त समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, इतिहासप्रेमी मंडळाचे भैरवनाथ वाकळे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, आसिफखान दूलेखान, बॉईज हायस्कूलचे माजी विद्यार्थी जफर खान, अजय सूर्यवंशी, डी.डी. सोनवणे, राजू देठे, सुनील बनसोडे, फिरोज शेख, विशाल केदारे, दीपाली कांबळे, स्मिता नाईक, विजय काकडे उपस्थित होते.

अभियानाच्या प्रमुख मागण्या शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती. दोन्ही शाळांचे हेरिटेज बेस्ड मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर. शिक्षकांची नियुक्ती व प्रलंबित वेतनाचा प्रश्न मार्गी लावणे. ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा व डिजिटल सुविधा निर्माण करणे. सिंथिया फॅरार आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासाचे संग्रहालय उभारणे. माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था व सीएसआर निधीतून विकास.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *