Headlines

'शत-प्रतिशत भाजपा'साठी कोकणात हालचाली:कणकवली ते रत्नागिरी संघटनात्मक बांधणीवर भर, बूथ पातळीवर संघटना बळकट करण्याचे चव्हाणांचे आवाहन




पुणे येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाने तळागाळात मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करत आगामी निवडणुकांसाठी रणनीती तयार केली आहे. सावंतवाडी आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये संघटनात्मक कामाचा आढावा घेत रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना अधिक आक्रमक होत संघटन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाने मैदानात उतरून गावागावांत देशभक्त कार्यकर्त्यांची फळी उभारावी आणि बूथ पातळी बळकट करावी, असा संदेश दिल्याने शत-प्रतिशत भाजपा’साठी कोकणात हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये संयम हवा रवींद्र चव्हाण म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये असंतोष कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला जात आहे. एखाद्या छोट्या घटनेचा देशभरात कसा उद्रेक होईल यासाठी विरोधातील प्रयत्न करत आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला ते कृत्य कसे होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संयम असला पाहिजे.
अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश कणकवली आणि रत्नागिरी येथे उभारल्या जाणाऱ्या ‘भाजपा भवन’च्या कामांची पाहणी करत, हे कार्यालय राष्ट्रसेवेची कार्यशाळा आणि कार्यकर्त्यांचे ऊर्जाकेंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे उत्तर रत्नागिरीत पक्षाची ताकद अधिक वाढल्याचा दावा केला जात आहे.. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मजबूत जनाधाराला संघटन कौशल्याची जोड देत ‘शत-प्रतिशत भाजपा’चे लक्ष्य गाठण्यासाठी पक्षाने कोकणात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचा खासदार आणि विविध नगरपरिषदांमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी आधीपासूनच कार्यरत आहेत. इथे भाजपची ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *