![]()
शहर-जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. वनविभागाने टप्प्याटप्प्याने वाचवलेले तसेच जेरबंद केलेले तब्बल ६ बिबटे वनविभागात वास्तव्यास आहेत. मागील १५ दिवसांपासून वनखात्याकडून या बिबट्यांची सरबराई सुरू आहे. वनविभागाकडून ही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठ
.
महिनाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात या वर्षातील पहिला बळी नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे गेला. बिबट्याने बाहेर झोपलेल्या व्यक्तीला उचलून नेऊन ठार केले. हा बिबट्या १५ दिवसांनंतर जेरबंद करण्यात यश आले. सध्या हा बिबट्या वनविभागात मुक्कामाला आहे. याव्यतिरिक्त विहिरीत पडलेले व सुरक्षेच्या कारणास्तव मानवी वस्तीत धुमाकूळ घालणारे सहा बिबटे वनविभागात आणून ठेवले आहेत. सध्या पथक सीक्युएव्ही परिसरातील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग ३ ड्रोनसह गस्तीवर आहे. परंतु, ड्रोनद्वारे सहा दिवसांपासून दिसणारा बिबट्या, दोन दिवसांपासून गायब झाल्याने धाबे दणाणले आहे. शहर परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागावर नाराजी व्यक्त होत आहे. तीन ड्रोनद्वारे निगराणी सुरू असतानाही सोमवारी दुपारपर्यंत बिबट्या दिसून आला नाही. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ आणि प्राणिसंग्रहालय मान्यता नियम २००९ नुसार, ताब्यातील वन्यप्राण्यांच्या आरोग्य, आहार व निवासाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बिबट्याच्या वय व प्रकृतीनुसार पौष्टिक खाद्य, नियमित वैद्यकीय तपासणी, सुरक्षित निवासाची व्यवस्था गरजेची आहे. पिंजऱ्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमित करणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाच्या ताब्यातील बिबट्यांचे वजन, वैद्यकीय अहवाल, खाद्याचे प्रमाण आणि देखभालीचे रजिस्टर तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.
बिबट्यांच्या देखभालीचे नियम काय सांगतात?
अहिल्यानगर वनविभागाच्या नर्सरीत ६ बिबटे आहेत. त्यापैकी एक बिबट्या हा गोधेगाव येथे एका व्यक्तीला ठार करणारा आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो जेरबंद केला होता. याव्यतिरिक्त नेवासे, घोसपुरीत विहिरीत पडलेले दोन संघर्षग्रस्त बिबटे आहेत. तसेच पिंपळगाव उजनी, निंबळक, खोसपुरी भागातील असल्याचे सांगितले जात आहे. वनविभागाकडून या बिबट्यांची स्थिती सुरक्षित अंतराहून पाहण्यास माध्यमांनाही मज्जाव केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एकूण बिबट्यांची संख्या ११५० { किती गावांत वावर – सुमारे ९७० { २०२३-२०२४ – ४ मृत्यू ३३ जखमी { २०२४-२०२५ – ८ मृत्यू ४७ जखमी { २०२५-२०२६- ११ मृत्यू २३ जखमी { एप्रिल २०२६ नंतर – १ मृत्यू, जखमी २