![]()
देशांतर्गत आधुनिक व मुख्यत: व्यावसायिक शेतीच्या पायाभरणीचे शिल्पकार दिवंगत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेबांचे संकल्पनेतील आत्मानिर्भर ग्रामव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “मॉडेल व्हिलेज” संकल्पना स
.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व कृषी विषयक विकासासाठी कृषी तथा शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेबांचा कार्य परिचय सर्वांसाठीच प्रेरक आहे. अत्याधुनिक शेतीशास्त्राचा देशांतर्गत शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने फायदा होण्यासाठी भाऊसाहेबांनी संसदेत व इतर माध्यमातून ठोस भूमिका मांडत कृषिप्रधान विकासाची संकल्पना वास्तवात उतरवली. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. शरद गडाख यांनी शाश्वत उत्पन्न देणारा फायदेशीर शेती व्यवसायच काळाची गरज असल्याचे सांगितले.डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यार्पण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, कुलसचिव प्रीती रोडगे आदींची उपस्थिती होती. सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर, डॉ. शैलेश हरणे, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. निशांत शेंडे यांच्यासह वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले. सकाळी स्व. डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह सर्व संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, कुलसचिव, नियंत्रक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कृषी उद्योग स्थापना, गटशेतीची संकल्पना पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना, असंघटित शेतकऱ्यांचे संघटन, सहकारातून गटशेतीची संकल्पना, भारत कृषक समाजाची स्थापना व यातून शेतकरी एकत्रितरण, कृषी उद्योगांची स्थापना, सहकाराच्या माध्यमातून वस्त्रोद्योग साखर उद्योग उभारणी, कृषी अर्थव्यवस्थेच्या संरचनेतील बदल, युवकांना आधुनिक शेतीचे शिक्षण व प्रशिक्षण देणे, शेतकरी संघटनांचे प्रारूप, कृषी अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्य वाढीसाठी शेतकऱ्यांचे संघटन, विचारांची देवाण-घेवाण आवश्यक, शेतकऱ्यांचे शोषण व दुर्लक्षितपणा दूर होणे गरजेचे, संघटनांची शासनासोबत सलगी आवश्यक, राजकारण विरहित शेतकरी संघटना गरजेच्या तथा हरितक्रांतीची पायाभरणी भाऊसाहेबांच्याच विचारातून झाल्याचे हरमकर यांनी सांगितले.