Headlines

काॅर्पोरेट जिहाद:न्यायालयात गैरहजेरीमुळे संभाजीनगरचा नगरसेवक मतीन ताब्यात, आराेपी निदा खानला आश्रय, नाशिक पोलिसांची नारेगावात कारवाई




नाशिक पोलिसांच्या पथकाने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला गुरुवारी (6 ऑगस्ट) सायंकाळी ताब्यात घेतले आहे. टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला नारेगाव येथे आश्रय दिल्या प्रकरणी त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने त्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिस व छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईला संभाजीगर शहर पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. दिवसभर तपासानंतर ताब्यात नाशिक पोलिस मतीनच्या अटकेचे वॉरंट घेऊन संभाजीनगरात आले होते. येथे पोलिस महासंचालक आलेले असल्याने पोलिस दल त्यात व्यस्त होते. काही वेळातच एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे पथकाने नारेगाव परिसरात शोध घेतला. सायंकाळच्या सात वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेत नाशिककडे नेण्यात आले. दरम्यान, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *