![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या मोठे राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “सध्याचे महायुती सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून त्यांची वारंवार फसवणूक करत आहे,” असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शह-काटशहाच्या खेळात सर्वसामान्य मराठा समाजाला बळीचा बकरा बनवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारकडून समाजाची वारंवार फसवणूक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुषमा अंधारे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “सरकारकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची कोणतीही स्पष्ट राजकीय इच्छाशक्ती नाही. प्रत्येक वेळी केवळ बैठका आणि आश्वासनांचा खेळ मांडून सरकार वेळकाढूपणा करत आहे. अशा खोट्या आश्वासनांमुळे मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत आहे आणि समाजाच्या भावनांशी खेळण्याचा हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे.” शिंदे-फडणवीस वादाचा फटका सर्वसामान्यांना सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. “राज्यात सध्या शिंदे विरुद्ध फडणवीस असा सुप्त राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या वर्चस्ववादाच्या आणि राजकीय शह-काटशहाच्या लढाईत जाणीवपूर्वक मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रेयवादाच्या या राजकारणात आरक्षणाचा मूळ प्रश्न बाजूला पडला असून, याचे थेट नुकसान सर्वसामान्य मराठा तरुणांना आणि समाजाला सहन करावे लागत आहे,” असा आरोपही त्यांनी केला. हेही वाचा.. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळे,मी बोकांडी बसलो तर उठणार नाही: सरकारने मुस्लिम, धनगर-मराठा समाजाची गळचेपी केली- मनोज जरांगे पाटील सरकार जसा त्रास मराठा समाजाचे खरे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे, तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, असा आक्रमक सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माढा येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. सविस्तर वाचा आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात ते दाखवून देऊ: संजय राऊतांचा भाजपला इशारा, जयंत पाटलांच्या विमान प्रवासावरही लगावला टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट, राज्यात झालेले पक्षांतर आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत उत्तरे दिली. सत्ता गेल्यावर भाजपची अवस्था ‘माचीसच्या रिकाम्या बॉक्ससारखी’ होईल, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. सविस्तर वाचा
Source link
शिंदे-फडणवीसांच्या राजकीय वादात मराठा समाजाचा बळी जातोय:सरकारकडून वारंवार फसवणूक, सुषमा अंधारे यांचा आरोप