![]()
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला स्पेन आणि ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यास येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी नमूद केले की, खटल्यातील मोजक्याच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असून खटला आता अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, ब्रिटन आणि स्पेनमधील बँक खाती १० वर्षांपासून बंद असल्याने आर्थिक टंचाई असल्याचे तिने म्हटले आहे. २०१२ मध्ये झाली होती शीना बोरा हिची हत्या एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची (२४) कारमध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली होती. २०१५ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिची आई इंद्राणी मुखर्जीला अटक झाली. मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात तिचा माजी पती पीटर मुखर्जी यालाही कटात सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Source link
शीना बोरा हत्या प्रकरण:इंद्राणी मुखर्जीचा परदेशवारीचा अर्ज कोर्टाने फेटाळला, इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता; सरकारी वकिलांचा युक्तिवाद