Headlines

शॉर्टसर्किटने पिंपळदरीतील ‎रोहित्र जळाले, अनर्थ टळला‎:युवकांची तत्परता; झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे मारल्याने आगीवर नियंत्रण




पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र डीपी जळून खाक झाली. गावाला वीजपुरवठा या डीपीवरून होत होता. सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास डीपीवरील तारांचे घर्षण झाले. मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या. आग भडकली. डीपीच्या परिसरात वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे काही क्षणांत आग उग्र झाली. डीपीखाली वायरने पेट घेतल्याचे दिसताच बसस्थानकावर उभे असलेले युवक तत्काळ डीपीकडे धावले. त्यांनी लाइनमनला फोन करून वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले. झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे वापरून आगीवर नियंत्रण मिळवले. नंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी नवीन डीपी बसवल्यानंतर गावाचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. ट्रान्सफॉर्मर किंवा डीपीच्या परिसरात वाळलेले गवत, कचरा किंवा काडीकचरा असल्यास त्वरित काढून टाका. जेणेकरून ठिणगी उडाली तरी वाळलेल्या गवतामुळे ती पसरू शकत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *