Headlines

श्रीरामपूर शहरातील नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे काम सुरू:202 हातपंप कार्यान्वित झाल्याने नागरिकांना दिलासा




श्रीरामपूर शहरातील पाणी टंचाईवर बंद असलेले हातपंप दुरुस्तीचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. नगरपालिकेने बंद पडलेले सुमारे २२ हातपंप दुरुस्त करून सुरू केले आहेत. पूर्वीचे १८० हातपंप सुरू होते. असे एकूण २०२ हातपंप कार्यान्वित झाल्याने नागरिकांना किमान वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील भागांमध्ये बंद पडलेल्या हातपंपांची तातडीने दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच पाणी साठवण तलावाचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बंद हातपंप त्वरित दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही बंद हातपंपावर काँक्रीट करून जागा वापरात आणली होती. याशिवाय शहरातील सुमारे ६५ बोअर सुरू आहेत. मात्र त्यांचे पाणी कमी पडू शकते म्हणून नगरपालिकेने ही खबरदारी घेतली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि स्व. आमदार जयंत ससाणे मित्रमंडळाच्यावतीने सुमारे १७ टँकरही सुरू करण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक नगरसेवकाने आपापल्यापरीने आपल्या प्रभागात टँकरने पाणी पुरवठा केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *