Headlines

संभाजीनगरच्या हनुमान टेकडी भागात मद्यपींच्या टाेळक्याने तरुणीची छेड काढल्याने तणाव:आराेपीच्या नातलगाने महिला काॅन्स्टेबलची काॅलर पकडली



शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यपींच्या टोळक्याने छेड काढली. त्यावर त्यांना जाब विचारल्यावर टोळक्याने तरुणींच्या मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. एवढेच नव्हे तर या मद्यपींच्या नातेवाइकांनी बेगम

.

या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सूरज सतीश साळवे (२०, रा. प्रगती कॉलनी), आकाश राजू म्हस्के (२३, रा. श्रावस्ती कॉलनी), ऋषिकेश रतन नवगिरे (२१, रा. टाऊन हॉल), आदर्श ईश्वर वाकेकर (२०, रा. टाऊन हॉल) यांच्यावर विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास २ उच्चशिक्षित तरुणी हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेल्या होत्या. तेथे रस्त्यात त्यांना त्यांचा एक मित्र भेटला. दरम्यान, परिसरातील एका बिअर शॉपीसमोर ४ तरुण दारू पीत उभे होते. त्यांनी तरुणींना पाहून अश्लील भाषेत कमेंट केल्या. या वेळी तरुणींसोबत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याच्या बॉडीगार्डने मद्यपींना जाब विचारला. तेव्हा या मद्यधुंद आरोपींनी बिअरची बाटली थेट मित्राच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. या वेळी गस्तीवरील पोलिस पथकाने चारही मद्यपींना बेगमपुरा ठाण्यात आणले.

रात्री १० वा. पोलिस ठाण्यात धिंगाणा

पोलिसांनी टवाळखोर मद्यपींना पोलिस ठाण्यात नेल्याचे कळताच, रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने बेगमपुरा ठाण्यात जमा झाले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून पोलिस ठाण्यातच गोंधळ घातला. हा राडा एवढा वाढला की, नातेवाइकांनी थेट महिला पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *