Headlines

सत्तेत येण्यासाठी भारत-पाकिस्तान युद्धाचा अजेंडा:शरद पवार दाऊद इब्राहिमचे मित्र; मला अनेकांचा इतिहास माहिती- प्रकाश आंबेडकर




देशातील राजकीय पक्ष विकले गेले आहेत. शरद पवार हे दाऊद इब्राहिमचे मित्र आहेत. मी अनेकांचा इतिहास सांगू शकतो; हा सर्व इतिहास आरएसएसच्या लोकांनी स्वतःकडे ठेवला आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, इथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकप्रकारे गुलाम करण्यात आले आहे. त्यामुळे देशाचे संविधानच नाही, तर स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, भाजपचा राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पाकिस्तानसोबत एखादे छोटेखानी युद्ध घडले, तर आश्चर्य मानू नका; हाच त्यांचा सत्तेत येण्याचा अजेंडा आहे. हे युद्ध केवळ सत्तेसाठी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील वातावरण बदलावे म्हणून हेच लोक पैसे देतील आणि आमच्यावर दोन-चार बॉम्ब टाका असे सांगतील. त्यानंतर देशातील सनातनी गावागावांत फिरायला सुरुवात करतील आणि मुस्लिम व पाकिस्तानच्या विरोधात वातावरणनिर्मिती करतील. यांचे हे युद्ध केवळ सत्तेसाठी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. नेपाळ आणि आपल्या देशात नेमके काय करार झाले, हे सामान्य माणसांना कळलेसुद्धा नाही. सत्ताधाऱ्यांना देश चालवायचा नाही. 19 लाख शेतकरी मदतीपासून वंचित प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात दुष्काळाची काहीच चर्चा केली जात नाही. सरकारी गोदामे रिकामी आहेत. हे सरकार कोणतीही आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेणार नाही, कारण ती त्यांच्या विचारसरणीला न पटणारी गोष्ट आहे. सरकारने केवळ 5 हजारांची मदत जाहीर केली आणि त्याचीच मोठी चर्चा घडवून आणली. ही मदतसुद्धा ज्यांचे नुकसान 33 टक्क्यांच्या वर झाले आहे, त्यांनाच मिळणार आहे. आता अशी आकडेवारी समोर येत आहे की, 19 लाख शेतकरी या 5 हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *