Headlines

सलाइन खुंटीला, आयुष्य टांगणीला:श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथे बंगाली डॉक्टरने पत्र्याच्या खोलीत थाटले क्लिनिक; बीएएमएसची पदवी बोगस




अहिल्यानगरच्या श्रीगोंदे तालुक्यात ६ हजार लोकसंख्या असलेल्या कौठा गावात बीएएमएस डॉक्टर असल्याचा दावा करत एक बोगस बंगाली डॉक्टर ८ वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही वैध परवाना नसताना “श्रीसान क्लिनिक’ नावाचे क्लिनिक सौरभ अधिकारी याने थाटल्याचे “दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आले आहे. क्लिनिकच्या भिंतीवर लावलेली प्रमाणपत्रे पश्चिम बंगालच्या “इंडियन कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सोसायटीज’ या खासगी संस्थेने जारी केली आहेत. केंद्रीय कायद्यानुसार, कोणत्याही पॅरामेडिकल संस्थेला बीएएमएससारखी मुख्य वैद्यकीय पदवी देण्याचा किंवा कुणालाही मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून नोंदणीकृत करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. गावात एकही डॉक्टर नसल्याने बोगस डॉक्टरचे फावले. आधी नोटीस बजावू, नंतर फौजदारी कारवाई कौठा परिसरातील त्या बोगस बंगाली डॉक्टरची माहिती तुमच्याकडून कळली. या प्रकरणात आधी त्याला नोटीस बजावली जाईल. क्लिनिक बंद करून त्याने कौठा सोडले नाही तर फौजदारी कारवाईबाबत पुढील पाऊल उचण्यात येईल. – डॉ. शैला डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी पं.स., श्रीगोंदा प्रमाणपत्रांचा पर्दाफाश प्रमाणपत्रावर ‘सेंट जॉन असोसिएशन अँड ट्रेनिंग सेंटर’च्या मंजुरीचा उल्लेख आहे, जी संस्था केवळ प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देते, पदवी नाही. भिंतींवर बुरशी श्रीगोंद्यातील क्लिनिकमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. रुग्णांवर उपचारासाठी येथे पडदे लावून ३ बेड टाकलेले आहेत. बेडशेजारी २ पिंजऱ्यांमध्ये सशे ठेवलेले आहेत. भिंतीवर बुरशी लागली आहे. पॅरामेडिकल संस्थेला बीएएमएस पदवी देण्याचा अधिकार नसताना तुम्ही उपचार कसे काय करता?
सौरभ अधिकारी : कोलकात्यात असताना मी शिकलो आहे.
प्रॅक्टिससाठी एमसीआयए परवानगी हवी, ती आहे का?
अधिकारी : लोकलचे माझ्याकडे काही नाही. ग्रामपंचायतीत सगळी कागदपत्रे दिली आहेत.
हाय-डोस अँटिबायोटिक्स आणि स्टिरॉइड्स कसे काय देताय?
अधिकारी : औषधे देण्याचे अधिकार नाहीत, पण कधी कधी रुग्णांना घरी सलाइन लावता येत नाही म्हणून तातडीच्या वेळी मी औषधे देतो व सलाइन लावतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *