Headlines

सहा नव्हे सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार:रामदास कदम यांच्या विधानाने खळबळ, आमदारही फुटीच्या मार्गावर असल्याचा केला दावा




शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार आज अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व खासदार सध्या मुंबईत दाखल झाले असून ते शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र या राजकीय घडामोडींदरम्यान शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक खुलासा केला असून, त्यांच्या माहितीनुसार या प्रवेशासाठी केवळ सहा नव्हे, तर तब्बल सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटातील फुटीर 6 खासदार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, ये तो झांकी है, और बहोत कुछ बाकी है. आमदार फुटीच्या मार्गावर आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकही संपर्कात आहेत. आता मी नावे सांगणार नाही, असेही कदम यांनी म्हटले आहे. सातव्या खासदाराचीही सही पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या बाजूला जे बसत आहेत, ते त्यांना फसवत आहेत. 6 नाही, सातव्या खासदाराचीही सही आहे. हे मी जबाबदारीने बोलतो आहे. त्यांनी मंत्रिपद मागितले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते परत गेले आणि आता ते उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसत आहेत. उद्धव ठाकरेंना माणसांची ओळख नाही, असे कदम यांनी म्हटले आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला ऑपरेशन टायगर संदर्भात बोलताना रामदास कदम म्हणाले, ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. ओमराजे निंबाळकर यांना रात्री काही लोकांनी भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाठवले गेले होते. पण निंबाळकरांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मला आज एकनाथ शिंदे यांचा खूप अभिमान वाटतोय. कारण, त्यांनी जो निर्णय घेतला त्याची आज अंमलबजावणी होत आहे. आज चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सहाही खासदारांचा प्रवेश होणार आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की मी कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, असेही कदम यांनी यावेळी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *