![]()
कोयना धरणातील पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावावरून पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी सुरू केलेल्या विरोधाचा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (25 नोव्हेंबर 2026) सडेतोड शब्दांत समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पाटील यांनी ‘शेतकऱ्यांची हाय लागेल’ अशी टीका केली होती. यावर पलटवार करताना महाजन म्हणाले की, “लोकप्रतिनिधींनी बोलण्यापूर्वी किमान 1 टक्के तरी अभ्यास करावा. आम्ही सांगली, सातारा किंवा कोयना धरणातून शेतकऱ्यांचे एक बादलीभरही पाणी उचलणार नाही; तर 1960 मेगावॉट वीजनिर्मिती झाल्यानंतर वशिष्ठी नदीतून थेट समुद्राला जाऊन मिळणारे पाणी पाईपलाईनद्वारे मुंबई आणि एमएमआर (MMR) क्षेत्रासाठी वळवण्याचा अभ्यास सुरू आहे.” यासोबतच त्यांनी जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या 12 जागा बिनविरोध निवडून आल्याचा दावा करत उर्वरित 9 जागांवर विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू, असा इशारा दिला; तसेच सुरतमध्ये जळगावच्या कुटुंबाला कालव्यात ढकलून दिल्याच्या गंभीर घटनेवर तातडीने पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्याचे सांगितले. 2014 ते 2019 मधीलच 25000 कोटींचा जुना प्रस्ताव कोयना प्रकल्पातील पाण्यावरून पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांवर मंत्री गिरीश महाजन यांनी तांत्रिक व प्रशासकीय वस्तुस्थिती स्पष्ट केली. हा काही आजचा किंवा अचानक समोर आलेला नवीन विषय नाही. 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी स्वतः जलसंपदा मंत्री असताना हा विषय प्रस्तावित झाला होता. त्यावेळी कोकणातील 111 प्रकल्पांची चौकशी सुरू असल्याने मुंबई व एमएमआर परिसरातील तीव्र पाणीटंचाईवर पर्याय म्हणून हा अभ्यास करण्यात आला. वॅपकॉस (WAPCOS) संस्थेने या प्रकल्पाचा अभ्यास करून त्यावेळी सुमारे 25000 ते 25500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. रोहित पाटलांना अभ्यासाचा सल्ला सांगली आणि साताऱ्याच्या शेतकऱ्यांचे पाणी मुंबईला नेऊन शेतकऱ्यांची हाय लागेल, असे म्हणणाऱ्या आमदार रोहित पाटील यांनी जबाबदारीने बोलावे. किमान 1 टक्के तरी अभ्यास केल्यास त्यांना कळेल की, धरणातील सिंचनाचे एक थेंबही पाणी घेतले जाणार नाही. वाया जाणारे पाणी मुंबई, एमआयडीसी आणि शेतीला देणार कोयना जलविद्युत प्रकल्पातून 1960 मेगावॉट वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वशिष्ठी नदीमार्गे थेट समुद्राला जाऊन मिळते. त्यापैकी केवळ 0.25 (पाव) टीएमसी पाणी लोटे एमआयडीसीला जाते, बाकी सर्व पाणी समुद्रात वाया जाते. हेच वाया जाणारे पाणी पाईपलाईनने आणल्यास वाटेत येणाऱ्या एमआयडीसी, शेती आणि तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुंबई शहराला मोठा फायदा होईल. तरीही कोणाच्या मनात शंका असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेऊन संपूर्ण सादरीकरण (प्रेझेंटेशन) दाखवतील. जळगाव जिल्हा बँकेत 12 जागा बिनविरोध जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आम्ही महायुती म्हणून पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत. आतापर्यंत आमचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 9 जागांवरही निवडणूक होत असून त्या सर्व जागांवर आम्ही विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू. मविआचे पॅनलच नाही, तर शंखनाद कशासाठी? महाविकास आघाडीकडे निवडणुकीत उतरवण्यासाठी उमेदवारच नाहीत आणि त्यांचे पूर्ण पॅनलही उभे राहिलेले नाही. असे असताना ते कशासाठी मागणी आणि शंखनाद करत आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. सुरतमध्ये जळगावच्या कुटुंबाला कालव्यात ढकलल्याची गंभीर घटना गुजरातमधील सुरत येथे कामासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील एका कुटुंबावर हल्ला करून त्यांना कालव्यात ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत संबंधित कुटुंबातील सदस्य बेपत्ता झाले असून, त्यातील एक मुलगा सुदैवाने बचावला आणि त्याने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “मला आत्ताच या घटनेची माहिती मिळाली असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मी तात्काळ जळगावच्या पोलीस अधीक्षकांशी (SP) संपर्क साधून सविस्तर माहिती घेत आहे आणि हा संपूर्ण विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून योग्य ती कारवाई केली जाईल.” —————————————————— हेही वाचा… 4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला: गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सांगली-साताऱ्याच्या शेतकऱ्यांचे एक बादलीभरही पाणी घेणार नाही:960 मेगावॉट वीजनिर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी मुंबईला आणणार; गिरीश महाजन यांचा रोहित पाटलांना टोला