Headlines

सातारच्या गांधी मैदानातील दहीहंडी कार्यक्रमाला गालबोट:स्टेजवर चढण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आयोजकासह आठ जणांवर गुन्हा




साताऱ्यातील राजवाडा येथील गांधी मैदानावर दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकासह आठ जणांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या आवाजात डीजे वाजविणे, सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे तसेच स्टेजवर चढण्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत आयोजक यश अजय सावंत (रा. मल्हारपेठ, सातारा) याने प्रसिद्ध रॅपर संबाटा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये आयोजकाला नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमादरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात डीजे सुरू ठेवण्यात आला. स्टेजची उभारणी अशा पद्धतीने करण्यात आली की, सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला. त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांच्या ३ सप्टेंबरच्या आदेशाचे उल्लंघन करून स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी करण्यात आली. स्टेजवर जाण्याच्या कारणावरून आयोजक व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन गटांत बाचाबाची होऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस हवालदार दीपक पोळ यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २९२, २९३, १८९(२), १९१(२), ११५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश सावंत, मयूर जाधव, सौरभ ऊर्फ कुंक्या खरात, धीरज शेळके, संग्राम नाणे, तुषार धोत्रे, अनिकेत पवार तसेच १० ते १२ अनोळखी व्यक्ती आणि डीजे मालक-चालक उदय बगेरा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *