Headlines

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत मतभेद:महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, जयकुमार गोरेंचा आरोप




सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी युतीधर्माचे पालन केले नसल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र स्थानिक पातळीवर त्यांची अंमलबजावणी झाली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. भाजपने या निवडणुकीत स्वतंत्रपणे आणि पूर्ण ताकदीने उमेदवार उतरवले असते, तर निकालाचे चित्र वेगळे असते, असा दावाही गोरेंनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत विविध राजकीय गट आणि पक्षांनी आपापल्या पातळीवर रणनीती आखली होती. महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची अपेक्षा असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत काही ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाल्याचे जयकुमार गोरे यांनी आपल्या वक्तव्यातून सूचित केले. निकालानंतर त्यांनी महायुतीतील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले. महायुतीमधील कोणत्याही नेत्यावर थेट टीका करण्याचा आपला हेतू नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. मात्र, वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले. युतीमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांनी एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र, या निवडणुकीत तसे घडले नसल्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, असे म्हणत त्यांनी निवडणुकीतील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. भाजपने स्वतंत्र लढत दिली असती तर निकाल वेगळा असता या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचा उल्लेख करताना जयकुमार गोरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने निवडणुकीत सहभाग घेतला. अनेक ठिकाणी अत्यंत कमी मतांच्या फरकाने निकाल लागल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर काय निकाल लागला असता, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले. खंडाळा मतदारसंघात अवघ्या 4 मतांचा फरक राहिला, तर फलटणमध्ये केवळ 5 मतांनी निकाल ठरला. कोरेगावमध्ये दोन्ही बाजूंमधील मतांचा फरक शून्य राहिल्याचे गोरे यांनी नमूद केले. या निकालांचा दाखला देत भाजपची ताकद या निवडणुकीत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. काही जागांवर थोड्याशा मतांच्या फरकामुळे निकाल बदलल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांना पाठिंबा पाटणमधील निवडणुकीचाही गोरे यांनी विशेष उल्लेख केला. या मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवली. त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिलो होतो. मात्र, तिथेही अवघ्या 6 मतांचा फरक राहिला, असे त्यांनी सांगितले. यावरून भाजपने निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांची माहिती देतानाच, युतीतील सहकार्याबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, अर्जुन काळे यांच्या विरोधात महायुतीमधीलच काही घटक पक्षांची भूमिका असल्याचे सांगत गोरे यांनी त्या निवडणुकीचा दाखला दिला. संबंधित विरोधी परिस्थिती असूनही ती जागा आपण जिंकली, असे ते म्हणाले. त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे ताकद दाखवली असल्याचा दावा त्यांनी केला. कॅटेगरीमधील पाचही जागा भाजपने लढवल्या असत्या तर… निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरही जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. कॅटेगरीमधील पाचही जागांवर भाजपने उमेदवार उभे केले असते, तर त्या जागा जिंकल्या असत्या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या संधी आणि प्रत्यक्ष निकाल यांचा विचार करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय अधिक योग्य ठरला असता, अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. एकीकडे महायुतीतील एकजुटीचा दावा केला जात असताना सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मित्रपक्षांमधील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जयकुमार गोरे यांच्या आरोपांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेदांना पुन्हा चर्चा मिळाली आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनांचे पालन झाले नसल्याचा त्यांचा आरोप आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता, हा दावा यामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकीय भूमिकांकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यास सतेज पाटलांचा विरोध:म्हणाले, असं झालं तर मतदानाला अर्थच राहणार नाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या राजकारणात आता शासन नियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेवर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाही पद्धतीने आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या बहुमताने चालला पाहिजे. मात्र, शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन बहुमताचा कौल बदलण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *