![]()
भाव-भक्तिगीतांच्या सुरेल स्वरांनी मोहोळकरांची पहाट प्रकाशमान झाली. निमित्त होते संगीत विद्यालय व संगीत कला अकादमीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. मागील पंधरा वर्षांपासून भक्तिमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम नरक चतुर्दशीच्या पहाटे मोहोळमध्ये संपन्न होतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीताची रुची वाढत आहे. विद्यार्थ्यांमध्ये कलेची साधना, निरंतर मेहनत, समर्पण आणि उपासना करण्याची सकारात्मकता यातून दिसून येते. या कार्यक्रमात निरंतर रियाज व साधनेबरोबरच प्रमुख अतिथी कलाकारांचे सादरीकरण प्रेरणादायी ठरते आहे. यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात,विद्यालय ाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच ; श्री मयूर पुराणिक यांचे गुरु-बंधू रूद्र मलघे, अथर्व आल्हाट व ओंकार अळ्ळगी यांची तबला – जुगलबंदी खूपच अप्रतिम, रोमांचक आणि मंत्रमुग्ध करणारी ठरली .यांना हार्मोनियमवर नगमा साथ मयूर पुराणिक यांनी केली. उद्घाटन दीपक आठवले, निखील गायकवाड, प्रभाकर निलकंठ या उपस्थित प्रेक्षकांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी केले. अध्यक्ष उमेश्वर पुराणिक यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पैगंबर तांबोळी,सचिन पवार,संतोष भुसे,संतोष कडबणे,राजेंद्र वाकळे यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी पालक व रसिक उपस्थित होते. गुरुवर्य पंडित अरविंदकुमार आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील प्रसिद्ध सरोद वादक नितेश पुरोहित यांनी छेडलेल्या राग बसंत-मुखारी व अभंगमालेच्या माध्यमातून मोहोळकर “तंतू स्वरांनी मंत्रमुग्ध झाले. सरोद वादनासोबत श्री गजानन इगवे व श्री मयूर पुराणिक यांनी केलेली तबला साथ, सार्थ व स्मरणीय ठरली. मोहोळकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
Source link
सुमधुर गीतांनी मोहोळकरांची पहाट रम्य:संगीत विद्यालय, संगीत कला अकादमीतर्फे आयोजन, सूर-वाद्याची जुगलबंदी