Headlines

पारंपरिक अलंकारातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मोहक रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी:दीपावलीनिमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार केले परिधान


.

परंपरेनुसार दीपावली निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली. श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट , नाम, कौस्तुभमणी, दंडपेठया जोड, हिऱ्याचे कंगन जोड,शिरपेच मोठा, शिरपेत लहान, तोडे जोड, मस्त्य जोड, मोठा लक्ष्मी हार, तुळशीची माळ, बाजीराव कंठी, मारवाडी पेठयांचा, मोतीहार, मोत्याची कंठी इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. दीपावलीनिमित्त सजलेले श्री विठ्ठलाचे सावळे रूप डोळयात साठवण्यासाठी विठ्ठल भक्तांची मंदीरात गर्दी होत आहे.

श्री रुक्मिणी मंदीर ही दागिण्यानी उजळून निघाले आहे. रुक्मिणी मातेस सोन्याचा मुखवट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवाड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार,मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. सोन्याच्या अलंकारानी नटलेले रुक्मीणी मातेचे रूप अधिकच मोहक दिसत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले. विविध पारंपरिक अलंकारानी सजलेले श्री विठ्ठल व माता रुक्मिणीचे रुप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *