![]()
स्वस्त धान्य दुकानाचा मासिक धान्य कोटा मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. मेघराज बाळासाहेब जाधव (वय 35, रा. वडूज, ता. खटाव) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराच्या स्वस्त धान्य दुकानाचा नोव्हेंबर महिन्याचा धान्य कोटा मंजूर करून देण्यासाठी जाधव यांनी 3,700 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर 3,500 रुपये स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर जाधव यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
Source link
स्वस्त धान्य दुकानाचा कोटा मंजूर करण्यासाठी लाच:पुरवठा निरीक्षकाला रंगेहाथ पकडले