Headlines

हिंगोलीतील कपडा गल्लीचे फटाका गोदाम अवैधच:जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचा इशारा, ‘डोअर टू डोअर’ तपासणी करणार




हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील फटाका साठवणुकीचे गोदाम अवैध होते. आता याभागात आणखी काही घरांमध्ये फटाका साठवणूक केली आहे का? काय याची शाहनिशा करण्यासाठी डोअर टू डोअर तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी ता. ६ दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे. या संदर्भात गुप्ता म्हणाले की, कपडा गल्ली भागात सोमवारी झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेतील गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाला आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत. गंभीररित्या भाजल्या गेलेल्या रुग्णांवर नांदेड, लातुर, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार केले जात असून त्यांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष आहे. हिंगोली शहरातच नव्हे तर जिल्हयात कुठेही यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडूनच आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. फटाका विक्रीचे परवाने देतांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे काय याची शाहनिशा करूनच फटाका विक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. तसेच फटाका साठवणुकीबाबत विक्रेत्यांकडून सविस्तर माहिती घेतली जाणार असून सदर गोदाम वस्तीपासून दूर अंतरावर असावे त्या ठिकाणी आगी सारखी घटना घडल्यास तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उपलब्ध असणे, अग्नीशमन यंत्र बसविलेले असले या माहितीचा समावेश आहे. याशिवाय त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगरांची नोंदणी आहे काय याबाबीची तपासणीही केली जाणार आहे. हिंगोली शहरातील त्या फटाके विक्रेत्याकडे परवाना नव्हता त्यामुळे तो साठा अनाधिकृत होता. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश या संदर्भात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *