Headlines

हिंगोली लोकसभेवर पुन्हा गद्दारीचा शिक्का?:नागेश आष्टीकरांच्या निर्णयाने विलास गुंडेवारांची आठवण ताजी




हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे हिंगोली लोकसभेवर दुसऱ्यांदा गद्दारीचा शिक्का बसणार आहे. यापुर्वी तत्कालीन खासदार विलास गुंडेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली जिल्हयातील वसमत, हिंगोली, कळमनुरी विधानसभा मतदार संघासह नांदेड जिल्हयातील हदगाव, किनवट तर यवतमाळ जिल्हयातील उमरखेड विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुर्वीच शिवसेनेच फुट पडल्यानंतर या ठिकाणची जागा महायुतीकडून शिंदेसेनेकडे तर महाविकास आघाडीकडून ठाकरेगटाला जागा सोडण्यात आली होती. दरम्यान, लोकसभेत प्रचाराच्यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर तोंडसुख घेण्यात आले होते. ठाकरे सेना विरुद्ध शिंदेसेना असाच निवडणुकीचा सामना रंगला होता. यामध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदेसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव केला होता. लोकसभेत विजय मिळविल्यानंतर खासदार नागेश पाटील यांनी अपेक्षे प्रमाणे हिंगोली जिल्ह्याशी संपर्क कमी केला होता. हिंगोली येथील कार्यालय त्यांचे कार्यकर्तेच सांभाळत होते. त्यानंतर आज खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षाच्या इतर पाच खासदारांसोबत वेगळा गट स्थापन करण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर ते ठाकरेंची शिवसेना सोडणार हे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे मागील दोन दिवसापासून ते पक्ष सोडणारच नाही असे ठामपणे सांगत होते. मात्र त्यांनी घेतलेली भुमीका पक्षातील कार्यकर्त्यांसह मतदारांनीही रुचली नसल्याचे चित्र आहे. त्यांनी पक्षासोबत गद्दारी केल्याचे स्पष्ट झाले असून हिंगोली लोकसभेला गद्दारीचा हा दुसऱ्यांचा लागलेचा शिक्का आहे. यापुर्वी तत्कालीन खासदार विलास गुंडेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमधे प्रवेश केला होता. या संदर्भात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्वीचऑफ असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. इतर दोघांनी केला पक्ष बदल काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी कार्यकाळ संपण्यापुर्वीच राजिनामा देऊन काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. तर विद्यमान राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. डॉ. सातवांना पुन्हा विधान परिषदेची लॉटरी लागली तर वडकुते यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *