![]()
वांबोरी उपबाजार आवारात कांद्याच्या दराला दोन दिवसांत चांगलीच उचल मिळाली आहे. ३० जुलैच्या तुलनेत सोमवारी झालेल्या लिलावात प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपयांची उसळी लिलावात पहायला मिळाली. सुमारे १८३ गोणी कांद्याला ३ हजारांवर भाव मिळाला. एक नंबर कांदा, एकूण सरासरी दर २१०० ते २८०० रुपये मिळाला. ३० जुलै रोजी वांबोरी उपबाजारात १४ हजार ७८५ गोणी कांद्याची आवक झाली होती. सोमवारी ही आवक वाढून १६ हजार ९०८ गोण्यांवर पोहोचली. म्हणजेच दोन बाजारदिवसांत आवकेत २,१२३ गोण्यांची वाढ झाली. मात्र, आवक वाढल्यानंतरही दरावर दबाव न येता उलट चांगल्या प्रतीच्या कांद्याला अधिक भाव मिळाला. ३० जुलैच्या तुलनेत सोमवारी केवळ कमाल दरच वाढला नाही, तर २५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळणाऱ्या कांद्याच्या गोण्यांचे प्रमाणही वाढलेले दिसते. त्यामुळे बाजारातील कांद्याच्या दराचा कल सध्या तेजीच्या दिशेने असल्याचे चित्र आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला २८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असून, काही लॉट्सनी तीन हजारांचा टप्पाही पार केला आहे. २ हजार ते २५०० रुपये : ८,६४४ गोणी, २५०० ते २८०० रुपये १,१८५ गोणी तर २८०० ते ३ हजार रुपये भाव १६५ गोणी तर २९०० ते ३ हजारांवर भाव सुमारे १८३ गोणींला मिळाला. मागील काही महिन्यांत कांद्याचे दर सुमारे २००० रुपये प्रतिक्विंटलहून अधिक आहे. . सद्यस्थितीत दोन नंबर कांदा १५०० ते २१०० तर तीन नंबर कांद्याला २०० रुपये ते १५०० रुपये प्रतिक्विंटलची बोली लागली. योगेश महाजन, कांदा निर्यातदार, कळवण, नाशिक. स्थानिक पातळीवर अर्थात भारतातच कांद्याची मोठी मागणी आहे. याव्यतिरिक्त कांदा निर्यातबंदी होण्याची शक्यता नाही. सद्यस्थितीत महाराष्ट्रात माल आहे, त्यामुळे यंदा डिसेंबरअखेरपर्यंत कांद्याला चांगले भाव राहतील. प्रसंगी ५० रुपये किलोपर्यंत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत दुबई, कोलंबो, मलेशियात कांदा निर्यात सुरू आहे.
Source link
16,908 पैकी 183 गोणीला 3,000 हजारांवर भाव:आवक वाढूनही 200 रुपयांची उसळी, कांदा 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता