बालविवाह रोखण्यासाठी पोलिस अॅक्शन मोडमध्ये:हिंगोलीत तरुणाने दिली चुकीची माहिती; खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल
गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असून तातडीने यावे असा संदेश मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हातचे काम सोडून जामठी बुद्रूक (ता.हिंगोली) गाव गाठले. मात्र त्या ठिकाणी सर्वत्र शांतता दिसून आली अन कुठलाही विवाह नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणात डायल 112 वर चुकीची माहिती देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी मंगळवारी ता. 21 रात्री उशिरा…