Headlines

Chardham Yatra Pilgrim Death | Yamunotri Trek Difficulty 2026

उत्तरकाशी1 तासापूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेच्या पहिल्या दिवशी दोन भाविकांचा मृत्यू झाला. उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या यमुनोत्री धामच्या पायी मार्गावर चढाई करताना महाराष्ट्रातून आलेल्या एका वृद्ध भाविकाची अचानक तब्येत बिघडली. त्यांना श्वास घेण्यास गंभीर त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ जानकीचट्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे चिकित्सक…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'चड्डी-बनियान गँग'ची एन्ट्री?:बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा ‘चड्डी-बनियान गँग’ सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने एटीएम मशिनचे नुकसान केले असले तरी बँकेची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदण्यात त्याला अपयश आल्याने लाखो रुपयांची रोकड बचावली आहे….

Read More

हिंगोलीत मारहाण प्रकरणात चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला:न्यायालयीन कोठडीत रवानगी; लोखंडी मुसळ व लाकडाने मारहाणीचे प्रकरण

हिंगोली शहरातील सराफा बाजारात किरकोळ कारणावरून सराफा व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणातील चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन अर्ज हिंगोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत अ्रॅड. अविनाश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील सराफा बाजार भागात सराफा व्यापारी साईनाथ उदावंत व त्यांचा मुलगा सागर उदावंत यांनी दुकानाचे बांधकाम सुरु केले होते. काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या या…

Read More

विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला:महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले. महिला आरक्षण व लोकसभेच्या जागा…

Read More

जम्मू-उधमपूरमध्ये रस्ते अपघातात 15 जणांचा मृत्यू:100 फूट खाली कोसळून बस उलटली, मृतांचा आकडा वाढू शकतो

जम्मूच्या उधमपूरमध्ये सोमवारी सकाळी एका बसला अपघात झाला. रामनगरहून येणारी बस जालोजवळ रस्त्यावरून 100 फूट खाली कोसळून उलटली. या अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाला, अनेक प्रवासी जखमी झाले. अधिकाऱ्यांच्या मते, मृतांचा आकडा वाढू शकतो. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सांगितले की, अपघातग्रस्त बस सार्वजनिक वाहतुकीची होती. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात…

Read More

म्हैसांग परिसरात पोलिसाच्या अंगावर‎ट्रॅक्टर घालण्याचा माफियाचा प्रयत्न‎:पोलिस अधीक्षक चांडक यांनी घेतली घटनेची गंभीर दखल

प्रतिनिधी | अकोला / बोरगाव मंजू म्हैसांग परिसरात कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव मंजू पोलिसांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत उघडपणे दादागिरी केली. शिवीगाळ, धमक्या आणि बेधडक वर्तनामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. वाळू माफियांकडून पोलिसांना धमकी देणारा या प्रकाराचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले फिर्यादी पोलिसाने…

Read More

श्री शिवाजी महाविद्यालयात रंगणार संत ज्ञानेश्वर महाराजांवर निरूपण:निरुपणकार गणेश शिंदे, गायिका सन्मिता शिंदे यांचे हाेणार गायन‎

प्रतिनिधी | अकोला संत परंपरेचा अमूल्य वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर आजही तितक्याच श्रद्धेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केला जातो. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. पंजाबराव उपाख्य…

Read More

मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा:पेठवडगाव येथील प्रकरण

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत पेठवडगाव येथे मयताच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन पंचनामा करण्यापासून रोखत मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेेठवडगाव येथील नवनाथ लाखाडे या तरुणाने पेठवडगाव शिवारात शनिवारी सायंकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस…

Read More

नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी:ED ने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले, कनिष्ठ न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नव्हती

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय सोमवारी ईडीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. ईडीने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. ट्रायल कोर्टाने 16 डिसेंबर 2025 रोजी ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने 22 डिसेंबर रोजी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर आरोपींना नोटीस बजावली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती…

Read More

महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय?:जुन्या ट्वीटची आठवण करून देत संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसारख्या संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी जनतेशी सत्य बोलण्याची शपथ घेतलेली असते. मात्र, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी सातत्याने जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “२०२३ मध्येच संसदेत नारी शक्ती अधिनियम मंजूर झाला आणि १६ एप्रिल रोजी त्याची अधिसूचनाही निघाली, मग आता पुन्हा…

Read More