Headlines

म्हैसांग परिसरात पोलिसाच्या अंगावर‎ट्रॅक्टर घालण्याचा माफियाचा प्रयत्न‎:पोलिस अधीक्षक चांडक यांनी घेतली घटनेची गंभीर दखल




प्रतिनिधी | अकोला / बोरगाव मंजू म्हैसांग परिसरात कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव मंजू पोलिसांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत उघडपणे दादागिरी केली. शिवीगाळ, धमक्या आणि बेधडक वर्तनामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. वाळू माफियांकडून पोलिसांना धमकी देणारा या प्रकाराचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले फिर्यादी पोलिसाने १८ एप्रिल रोजी उशिरा रात्री दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक शुभम मानकर (रा. भुईखेड) याच्या विरोधात १९ एप्रिलला विविध कलमान्वये बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने नदीचे पात्र अक्षरशः पोखरून काढले जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असून पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत आहे. स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. उर्वरित पान ४ वेळीच पोलिस कर्मचारी बाजुला झाल्याने पुढील अनर्थ टळला.त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, या घटनेची दखल पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घेतली आहे. एकाच रॉयल्टीवर दिवसभर शेकडो ब्रास वाळूचा उपसा एकाच रॉयल्टीवर दिवसभर शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत असतानाही महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना संबंधित अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत आहेत, यामुळे अवैध वाळू उपशाला जणू मोकळे रान मिळाले आहे. हा वाळू घाट शासनाने लिलावातून दिला असला तरी प्रत्यक्षात ‘दोन हजार रुपये द्या आणि रात्रंदिवस उपसा करा’असे बिनधास्त सूत्र राबवले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. एकाच रॉयल्टी वर दिवसभर शेकडो ब्रास वाळू काढली जात असल्याने शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. अनियंत्रित उत्खननामुळे पूर्णा नदीचे पात्र खोलवर जात असून, पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडतात आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *