Headlines

काँग्रेसची डबल ढोलकी स्वतःच्याच मंत्र्यांच्या विधानाने उघडी!:संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी कपिल सिब्बल यांचा जुना व्हिडिओ केला शेअर




मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संसदेतील ऐतिहासिक पुराव्यासह काँग्रेसचा बुरखा फाडला आहे. संपुआ (UPA) सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेचे ठाम समर्थन करत दिलेले स्पष्टीकरण आणि अधिकृत रेकॉर्डवरील व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. “काँग्रेसच्या राजकारणाचे रंग सोयीनुसार बदलले, तरी संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत,” असा घणाघाती टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. दिल्लीत 3 दिवसांपासून काँग्रेसचा आखाडा; मुख्यमंत्र्यांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी काढलेला मोर्चा, रस्त्यावर झालेली धक्काबुक्की आणि राहुल गांधींना झालेली तात्पुरती अटक या घडामोडींमुळे दिल्लीतील राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. काँग्रेस नेते एसआयआर प्रक्रियेला ‘मतदारांचे अधिकार हिरावून घेणारे षड्यंत्र’ ठरवत आंदोलन तीव्र करत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सोशल मीडिया पोस्टने काँग्रेसला राजकीय खिंडीत पकडले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर “काँग्रेसची डबल ढोलकी!” या शीर्षकाखाली तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांचा संसदेतील जुना व्हिडिओ पोस्ट केला. कपिल सिब्बल यांच्या व्हिडिओतील वक्तव्य काय? मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेअर केलेल्या अधिकृत संसदीय कामकाजाच्या व्हिडिओत तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल एसआयआर आणि मतदार वगळणीच्या नियमांवर संसदेत स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. मतदार वगळणीच्या 3 स्पष्ट श्रेणी: नावे जोडण्याचा नागरिकांचा अधिकार अबाधित सिब्बल पुढे स्पष्ट करताना म्हणतात की, “केवळ याच कायदेशीर निकषांवर मतदाराचे नाव यादीतून वगळले जाते. जर कोणत्याही नागरिकाला आपले नाव नाहक वगळल्याचे वाटत असेल, तर तो थेट स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन नाव नोंदवण्याचा हक्क बजावू शकतो. कोणताही अधिकारी नागरिकाला नाव नोंदवण्यापासून अडवू शकत नाही. त्यावेळी 36 लाख 44 हजार 105 मतदारांनी स्वतःहून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल केले होते.” काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला; विरोधकांची कोंडी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत काँग्रेसवर दुटप्पीपणाचा थेट आरोप केला. संपुआ सरकारच्या काळात काँग्रेसचे स्वतःचे ज्येष्ठ नेते आणि कायदामंत्री ज्या प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेचे संसदेत छातीठोकपणे समर्थन करत होते, तीच प्रक्रिया आज देशातील बनावट, मयत आणि स्थलांतरित नावे वगळण्यासाठी राबवली जात असताना काँग्रेस त्याला ‘संविधानाची हत्या’ आणि ‘मतचोरी’ म्हणून लोकांची दिशाभूल का करत आहे? असा सवाल त्यांनी केला. कदाचित स्वतःचा इतिहास विसरले “विरोधक केवळ राजकीय वैफल्यातून संस्थांवर आणि निवडणूक आयोगावर चिखलफेक करत आहेत. परंतु अधिकृत कागदपत्रे आणि संसदेतील रेकॉर्ड काँग्रेसचा हा दुटप्पी चेहरा उघडा पाडत आहेत. आता जनतेनेच ठरवावे की कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे,” असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. मुख्यमंत्र्यांच्या या थेट पुराव्यानंतर आता दिल्लीत रान उठवणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाकडून या जुन्या संसदीय भूमिकेवर काय खुलासा केला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. —————————————————————- हेही वाचा… सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने; राहुल, प्रियंका असे केव्हापर्यंत करणार: जाणून घ्या विरोधकांची रणनीती; ज्ञानेश कुमार प्रकरणी पुढे काय होणार 6 ऑक्टोबर 2026 ची सकाळ. राहुल गांधी विरोधी खासदारांसोबत निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढत होते. पोलिसांनी अडवले, तेव्हा त्यांनी आकाशवाणी भवनात ठिय्या दिला. 8 तासांनंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले आणि मध्यरात्री उशिरा सोडून दिले. 7 ऑक्टोबर 2026 ची दुपार. राहुल गांधी यांनी कनॉट प्लेसमधील एका रेस्टॉरंटमध्ये विरोधी खासदारांसोबत दुपारचे जेवण घेतले. त्यानंतर जंतर-मंतरवर धरणे देण्यासाठी निघाले. पोलिसांनी अडवले, तेव्हा ते रस्त्यावर बसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि 2 तासांनंतर सोडून दिले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *