दूधपंढरीत चारा टंचाईची झळ; मुरघासाचा खर्च आवाक्याबाहेर!:जिल्ह्यात 16 लाख पशुधन, 58 हजार हेक्टरवर मका
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच, जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध चाऱ्याचे भाव कमालीचे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर सुमारे १६ लाखांवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी मुरघासाच्या बॅगा भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, वाढत्या दरामुळे एका हजार ते अकराशे किलोच्या बॅगेचा खर्च चार ते पाच हजारांवर पोहोचला आहे. राज्यात दूधउत्पादनात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर…