'आधुनिक भारतासमोरील आव्हाने' पुस्तकाचे प्रकाशन:प्रफुल्ल केतकर म्हणाले, आत्मबोध जागृत करून शत्रूबोध ओळखणे गरजेचे
ज्येष्ठ विचारवंत आणि साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी ‘आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी महत्त्वाचे प्रतिपादन केले. भारतीयांनी आपला ‘आत्मबोध’ जागृत करून खऱ्या ‘शत्रूबोधा’ची ओळख करून घेणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) दृक-श्राव्य सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सागर शिंदे, डॉ. पंकज जयस्वाल, रूपाली भुसारी आणि…