Headlines

विज्ञान चळवळ होण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक -अनिल काकोडकर:कुंभारी येथे विज्ञान, इनोव्हेशन केंद्राचे भूमिपूजन; नवीन संकल्पनांवर चर्चा व्हावी‎

प्रतिनिधी | अकोला प्रत्येक कामाचे ज्ञान असणे व ते का हवे याचे भान व त्या कामासाठी समर्पण असणे गरजेचे आहे. ज्ञान, जाण व पॅशन या त्रिसूत्राने कोणत्याही बाबीचा विकास साधला जातो. याच अनुषंगाने हे विज्ञान व इनोव्हेशन केंद्र नवे प्रकल्प, नवाचार साकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अणू वैज्ञानिक डॉ. अनिल…

Read More

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांचा निरोप:सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी

प्रतिनिधी | अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात केमिकल क्लबचा समारोप व भाग-२ च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्य.प. सदस्य डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख अतिथी म्हणून अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सुजाता काळे, अधिसभा सदस्य डॉ. जागृती बारब्दे, डॉ. जयंत वडतकर, केमिकल क्लब समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, प्रा.ए.एस. वानखडे, प्रा. आर.डी….

Read More

दिव्यांग, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार:प्रहार संघटना कायम राहणार, बच्चू कडू यांची घोषणा

आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य…

Read More

वीज प्रश्नावरून महावितरणवर‎नगरसेवक अन् महिलांचा मोर्चा‎:महावितरण विभाग तक्रारी गांभीर्याने घेत नाही, नागरिकांचा आरोप‎

प्रतिनिधी | दर्यापूर शहरात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने सामान्य नागरिक विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दर्यापुरच्या नगरसेवकांनी आज, बुधवारी दुपारी थेट विद्युत वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नगरसेवकांनी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निषेध…

Read More

शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी‎ पाणी बचत करणे हाच एकमेव मार्ग‎:नेवासेत घुमला जल व्यवस्थापनाचा नारा, खडका फाटा येथे जलजागृती‎

प्रतिनिधी | नेवासे फाटा पाणी बचत करून शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्ते बाबुलाल पटेल यांनी व्यक्त केले. मुळा पाटबंधारे विभागाच्यावतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा निमित्ताने खडका फाटा येथील अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक महाविद्यालय येथे आयोजित पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळेत ते…

Read More

सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण:76,500 वर, निफ्टीही 300 अंकांनी घसरला; ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 1000 अंकांच्या घसरणीसह 76,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 300 अंकांची घसरण झाली आहे, तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल, बँकिंग आणि रिॲल्टी शेअर्समध्ये जास्त घसरण झाली आहे. भू-राजकीय तणाव आणि युद्धासारख्या परिस्थितीत महागाई वाढण्याचा धोका असतो….

Read More

कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आ. काळे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेवून कमी असलेल्या बसच्या…

Read More

यशवंत टॅलेंट सर्च परीक्षेत‎विद्यार्थ्यांचे घवघवीत यश‎:५५ शाळांमधील ३२०० विद्यार्थ्यांचा सहभाग‎

प्रतिनिधी | सोनई नेवासा तालुक्यातील दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित यशवंत टॅलेंट सर्च या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील एकूण ३२०० विद्यार्थी ५५ शाळांमधून सहभागी झाले होते. या निकालात तालुका स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये यश अकॅडमीचा अमेय लेंबे ९६ टक्के गुणांसह प्रथम, श्रीनिका बानकर, आरुष कुलकर्णी, सागर धापटे दोघे यांनी ९४ टक्क्यांसह द्वितीय, तसेच ९० टक्के…

Read More

स्केटिंग स्पर्धेत चिमुकल्या‎खेळाडूंनी गाजवले मैदान‎:स्पर्धेत नगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खेळाडूंचा डंका‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्यातील आधुनिक २०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक स्केटिंग रिंकवर प्रथमच आयोजित करण्यात आलेली राजस्व स्पीड स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन राजस्व स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक चेतन शहाणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. स्पर्धेचे नियोजन स्केटिंगपटू प्रशांत पाटोळे यांनी केले. स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांच्या…

Read More

विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर…

Read More