Headlines

गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त‎

लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेल पोलिसांना साेमवारी शरण येणार, कोणतीही पळवाट न उरल्याने शरण यावेच लागणार

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन आता छत्रपती संभाजीनगरशी जोडले गेले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन . या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

जालन्याहून बहिणीच्या घरी जाणाऱ्या महिलेचे रिक्षा चालकाने केले अपहरण:एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेले. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे’ असे सांगत मदतीचा आर्त प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार,…

Read More

‘पैशांची मनीषा’ हेच पेपर फुटीचे कारण- सीबीआय:पुण्यातील फिजिक्स पेपरसेटर मनीषा हवालदारची कबुली

नीट पेपरफुटीप्रकरणी अटकेतील पुण्यातील फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न फोडले. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने संभाव्य प्रश्नांच्या नोट्स जाळूनही टाकल्या, अशी कबुली तिने दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, सलग ९ दिवसांपासून लातुरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने शनिवारी दुपारी प्रा. शिवराज मोटेगावकरच्या ‘आरसीसी’च्या कार्यालयात दुपारी ४ ते रात्री ८ वाजेनंतरही ठाण मांडून संगणकातील…

Read More

दिपकेला धमकी- ‘कॉक्रोच जनतापार्टी’ बंद कर, नाही तर शोधून मारू:अभिजित दिपकेच्या संभाजीनगरातील घराभाेवती पोलिसांचा बंदोबस्त

सोशल मीडियावरील ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक पेजवरून देशातील बेरोजगारी आणि व्यवस्थेवर टीका करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाला अमेरिकेत जाऊन जिवे मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेच्या वाळूज येथील घराभोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. अभिजित अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. ‘पैसे घे आणि पेज बंद कर,अन्यथा अमेरिकेत शोधून मारू,’ अशा शब्दांत…

Read More

पंतप्रधान आवास योजना:घरकुलासाठी नदीपात्रातील पूर्ण साठ्याच्या 10% वाळू मोफत, राज्यात 1.77 लाख कोटींची गुंतवणूक, 12 लाख घरांचे बांधकाम मार्गी

राज्यातील नदीपात्रात उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू आता पंतप्रधान घरकुल योजनेतील घरांच्या बांधकामासाठी मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकारने १५ मे रोजी हा नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यातील १२ लाख घरांच्या रखडलेल्या व सुरू असल . राज्यात वाळू टंचाई आणि धोरणातील सततच्या बदलांमुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळण्यात…

Read More

Mission 2029…opposition’s 30-month agitation mode, regional leaders including Rahul Gandhi will surround BJP

Marathi News National Mission 2029…opposition’s 30 month Agitation Mode, Regional Leaders Including Rahul Gandhi Will Surround BJP दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आंदोलनात्मक रणनीती आखण्यास सुरुवात केली. बदलते राजकीय वातावरण, जनतेशी संबंधित प्रश्न, आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता जनआंदोलनाची संधी असल्याचे विरोधकांना वाटत आहे. या…

Read More

साताऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन लोकांना गंडवणारे 17 जेरबंद:छापेमारीत लॅपटाॅप, रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून सातारा पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. हे सायबर चोरटे ‘अ‍ॅमेझॉन’वरून खरेदी झाल्याची खोटी बतावणी करून अमेरिकन नागरिकांना डॉलरमध्ये गंडवत होते. या कारवाईत २१ लाख रोख, लॅपटॉप आणि डेटा असा एकूण ३५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘श्रीसाई लॉजिस्टिक्स’च्या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून…

Read More

भूसंपादन:आरापूर एमआयडीसी, 16 दिवसांत जमिनीची 85 टक्केच मोजणी पूर्ण, 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असली तरी १० दिवसांचे जमीन मोजणीचे टार्गेट असलेल्या आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील ८५ टक्केच जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या तीन गावांतून ७६२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर अखेर ६ मे रोजी मोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच सुलतानाबाद येथील शेतकऱ्यांनी…

Read More

पॉस मशीनवरून एप्रिलचा डेटा गायब:तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक अडचणी, अचलपुरातील नागरिक त्रस्त

राज्य शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचलपूर तालुक्यात राशनधारकांना केवळ दोन महिन्यांचाच धान्यसाठा मिळत आहे. यामुळे राशनधारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. रेशन दुकानदार आणि काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांच्या पॉस मशीनवरील एप्रिल महिन्याचा डेटा…

Read More