पेरणीपूर्वीच बळीराजा संकटात, डिझेल महागल्याने मशागत खर्चात 20% वाढ:मजूर टंचाई-उसाची एफआरपी न मिळाल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कात्रीत
. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या मशागतीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिल्ह्यात आधीच काही कारखानदारांनी उसाची एफआरपीप्रमाणे बिले अदा केलेली नाहीत. त्यातच आता शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याने आणि उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहोळ तालुक्यात…