अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी:महाआवास अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक, अमरावती विभागाने विविध स्तरावरील आठ पुरस्कार पटकावले
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान २०२३-२४’ मध्ये अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…