Headlines

कोर्टीत रास्ता रोको करताच वीजपुरवठा सुरळीत:आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फसला; तातडीने सिंगल फेज सुरू

कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सिंगल फेज वीज मिळत नाही. थ्रीफेज विजही रोटेशन पद्धतीने दिवसा न मिळता फक्त रात्रीचाच वेळ दिल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी पंढरपूर-कराड मार्गावर कोर्टी महादेव मंदिराजवळ रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा…

Read More

जिल्ह्यातील 8300 मेडिकल शटर राहिले बंद‎:ऑनलाइन औषध विक्री विरोधात केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनचा संप, जिल्ह्यात प्रतिसाद‎

ऑनलाइन औषध विक्री आणि ई-पोर्टल्सच्या मनमानी कारभाराविरोधात अहिल्यानगर जिल्हा आणि शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार (२० मे) रोजी कडकडीत बंद पाळला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला होता. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ३०० लहान-मोठ्या औषध विक्रेत्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली. या आंदोलनादरम्यान…

Read More

माणिकदौंडी शिवारात भरधाव कारचा भीषण अपघात, 2 ठार:धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, दाेन जण जखमी‎

तालुक्यातील माणिकदौंडी ते बोरसेवाडी फाटादरम्यान हॉटेल शुभमजवळ राज्य मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पाथर्डीहून मिरजगावच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. कालिदास शहादेव बनकर (३२) व बबन किसन खेतमाळीस (७०, दोघेही…

Read More

‘फुलशिवरा'' गावाने घडवले 7 पीएसआय‎:सख्ख्या भावांची उपनिरीक्षकपदी निवड, युवकांना गावातच मिळतेय प्रशिक्षण

मकसूद शेख | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा गावाने ‘पोलिसांचे गाव’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवघी १८०० लोकसंख्या असलेल्या या गावातील आजमितीस ७ पोलिस उपनिरीक्षक आणि ४९ पोलिस कार्यरत आहेत. गावाची ही ख्याती वसुसायगाव येथील भाऊसाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाली आहे. दरम्यान, यंदा पोलिस दलात भरती झालेल्या व उपनिरीक्षपदी निवड झालेल्यांचा ग्रामस्थांच्या…

Read More

शिवन्यात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; रस्त्याच्या कडेलाच टाकतात कचरा:कचरामुक्तीच्या केवळ घोषणा, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

स्वच्छ भारत अभियान (टप्पा दोन) अंतर्गत गाव हागणदारीमुक्त व कचरामुक्त करण्याच्या वल्गना एकीकडे शासन पातळीवर केल्या जात असताना, प्रत्यक्षात सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधून प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला . ग्रामपंचायत आवारात साचलेला कचरा, गल्लोगल्ली तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, तुटलेले ढापे आणि नळाला येणारे अशुद्ध पाणी यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या…

Read More

ग्रामस्वच्छतेत भोकणी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर‎

सिन्नर तालुक्यातील झाडांचे गाव म्हणून ओळख असलेल्या भोकणी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ मध्ये नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत नवा मान मिळवला आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन आणि लोकसहभागाच्या बळावर ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रभारी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांचे या यशामागे योगदान मानले जात आहे….

Read More

मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा; पंपांवर डिझेल नसल्याचे फलक:वणी परिसरात वाहतूकदारांसह उद्योगधंदे अडचणीत; शेतीची कामे खोळंबली‎

डिझेलचा अपुरा पुरवठा, वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, उद्योगधंदे तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. . जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत असून ग्रामीण भागातही त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रिक शेगडी…

Read More

कमळ पक्ष्याची जून-सप्टेंबरऐवजी मेमध्येच पिल्ले:पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी उलगडले नांदूरमध्यमेश्वरातील पक्ष्याचे नवे वर्तन‎

. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात कमळ पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिजंट-टेल जाकाना या पक्ष्याच्या प्रजनन वर्तनामध्ये संभाव्य बदलाची नोंद पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी केली आहे. सामान्यतः फिजंट-टेल जाकाना हा पक्षी पाण्यावर तरंगणाऱ्या कमळाच्या पानांमध्ये किंवा जलवनस्पतींच्या सुरक्षित भागात घरटी बांधतो. त्याच्या लांब व बारीक बोटांमुळे तो पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींवर सहज हालचाल करू शकतो. त्यामुळे कमळाची…

Read More

वीज जोडणीसाठी जि.प. कडून महावितरणसाठी 6 गुंठे जागा:अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी दिली माहिती‎

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, या भव्य इमारतीच्या वीज जोडणीसाठी महावितरणने सबस्टेशन उभारण्याकरिता ६ गुंठे जागा किंवा साडेतीन कोटींची मागणी केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी महावितरणसोबत अध्यक्ष अविनाश गलांडे, बांधकाम सभापती सचिन गरड यांनी बैठक घेतली. यात महावितरणला ६ गुंठे जागा देण्याचे अंतिम करण्यात आले. तर वीजबिल कमी यावे यासाठी प्रशासकीय…

Read More

पैठण, सिल्लोड, कन्नडला इंधनाचा तुटवडा:डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ, पंपावर सकाळपासूनच गर्दी, अनेक ठिकाणी ‘नो पेट्रोल’चे फलक‎

जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, लासूर स्टेशन, नाचनवेल, कन्नड परिसरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनधारकांच्या पंपावर लांबच लांब रांगा लागत आहे. दरम्यान, सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टरसाठी इंधनच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. पैठणला गेल्या दोन दिवसांपासून इंधनटंचाईमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. ग्रामीण…

Read More