Headlines

दुभाजकाला धडकून बैतुल येथील दुचाकीस्वार ठार:नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला, मोर्शीतील तहसील कार्यालयाजवळील घटना

मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकलस्वाराची धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात घडला. बाजीराव कुमरे (वय ३२, राहणार बैतुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १७ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव कुमरे हे मोर्शीजवळील दुर्गवाडा येथे…

Read More

'एल निनो'मुळे अमरावती जिल्हा परिषदेचा जलसंधारणावर भर:पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कामांचे नियोजन

अमरावती जिल्ह्यात ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत जलसंधारणाच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे,…

Read More

पर्वणी सोनोनेचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक:नागपूर येथील 29 व्या ‘नृत्यसंस्कृती’ स्पर्धेत अमरावतीची मान उंचावली

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ‘नृत्यसंस्कृती’ राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अमरावतीची पर्वणी शैलेश सोनोने हिने ज्युनिअर गटातील ‘सेमीक्लासिकल’ नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघातर्फे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत पर्वणीने शहराची मान उंचावली. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या गुणवंत स्पर्धकांमुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली होती. अशा कठीण स्पर्धेत पर्वणीने आपल्या…

Read More

अमरावतीत कोबार्क येथे कॅरिकॅचर, एआय कार्यशाळा:कला आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून कलाप्रेमींना मिळाली नवीन कौशल्ये

अमरावती येथील कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजीनियरिंग अँड रिसर्च सेंटर (कोबार्क) येथे १६ मे रोजी एक दिवसीय कॅरिकॅचर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अमरावतीतील कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कला आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणारी ही कार्यशाळा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरली. ‘कार्टून आणि कॅरिकॅचर’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत प्रख्यात कलाकार, ॲनिमेटर आणि…

Read More

माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची पक्षातर्फे गुळतुला:अमरावतीत गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

अमरावती येथे माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ‘गुळतुला’ करण्यात आली. या प्रसंगी गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले. हा कार्यक्रम स्थानिक गौरक्षण येथे काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. ॲड. ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व वंचित महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप…

Read More

Dagdusheth Ganpati Trust Gets A Class Tourism Status; CM Devendra Fadnavis Announcement

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला राज्य सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून ही घोषणा केली, ज्यामुळे देशभरातील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धास्थानाला नवी ओळख मि . या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि मंदिराच्या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला १३५…

Read More

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात!:एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 20 जण जखमी

कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात…

Read More

Kerala CM & 21 Ministers Oath Taking; Congress, IUML MLAs

तिरुवनंतपुरम4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळममध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) च्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह २१ मंत्री असतील. शपथविधीपूर्वी रविवारी २० मंत्र्यांची नावे निश्चित झाली. यामध्ये मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त ११ मंत्री काँग्रेसचे आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या ५ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. केरळम काँग्रेस, केरळम काँग्रेस (जेकब), रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) आणि CMP (कम्युनिस्ट मार्क्सिस्ट…

Read More

एकनाथ शिंदेंचा अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा:पुण्यातील जमिनीच्या TDR प्रकरणाला तात्पुरती स्थगिती, नेमके प्रकरण काय?

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर (TDR) प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अंतिम निर्णय होईपर्यंत पुणे महानगरपालिकेने केलेल्या संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे गेल्या २६ वर्षांपासून कायदेशीर लढा देणाऱ्या चव्हाण कुटुंबाला मोठा…

Read More

सातारा क्राईम जगत:वृद्ध महिलेला लाकडी स्टिकने मारहाण; अल्पवयीन मुलीचा पाठलाग, तरुणाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा

सातारा तालुक्यातील लिंब गावातील चतुरबेट परिसरात कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय महिलेला लाकडी स्टिकने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब गावातील चतुरबेट येथे १५ मे रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही घटना घडली. वत्सला हणमंत सावंत (वय ६५) यांना सोहम…

Read More