शिरूरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा:एक अटकेत, 500 लिटर रसायन, 200 लिटर दारू जप्त
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात निमगाव भोगी परिसरात शिरूर एमआयडीसी पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू आणि एक मोटार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेळके…