पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाकडून 76 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट:देशव्यापी मोहिमेत 780 किलो अंमली पदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट
पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने अंमली पदार्थ विरोधी देशव्यापी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७६.०२ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य असलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. सीमाशुल्क विभाग आणि महसूल गुप्तवार्ता संचनालय (DRI), पुणे यांनी जप्त केलेला हा साठा होता. एकूण सतरा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा अंमली पदार्थांचा आणि सायकोट्रॉपिक घटकांचा साठा होता. अंमली…