Headlines

खासगी ट्रॅव्हल्सची लूट थांबणार!:बेकायदेशीर भाडेवाढ रोखण्यासाठी विशेष समिती; परिवहन मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यात खासगी प्रवासी बस वाहतुकीदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून तक्रारी येत आहेत. याबाबत आता शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे…

Read More

घटस्फोटाच्या चर्चेवर मौनी रॉयने मौन सोडले:म्हणाली- आम्हाला गोपनीयता द्या, चुकीच्या बातम्या पसरवू नका; सोशल मीडियावर पतीला अनफॉलो केले

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचे पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान आता मौनीने मौन सोडले आहे. मौनीने सोशल मीडियावर लोकांना तिच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नोट शेअर करत लिहिले, “सर्व मीडिया हाऊसेसना नम्र विनंती आहे की त्यांनी चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. आम्हाला जागा आणि गोपनीयता द्या, कृपया.”…

Read More

पुणे महापालिकेत निधी वाटपात भेदभाव:सुनेत्रा पवारांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; 'सबका साथ, सबका विकास'ची करून दिली आठवण

पुणे महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक निधी मिळाल्याचे समोर आल्यानंतर, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ची आठवण करून देत, “शहराचा…

Read More

मणिपूरमध्ये 3 चर्च नेत्यांची गोळ्या घालून हत्या:कांगपोकपी जिल्ह्यात घटनेनंतर दहशत-तणाव, संतप्त लोकांनी राष्ट्रीय महामार्ग-2 बंद केला

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात बुधवारी थाडौ बॅप्टिस्ट असोसिएशन (TBA) च्या तीन चर्च नेत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इतर 5 जण जखमी झाले आहेत. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी दबा धरून हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर कांगपोकपी आणि आसपासच्या कुकी-जो बहुल भागांमध्ये तणाव पसरला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी दगड आणि लाकडी अडथळे लावून राष्ट्रीय महामार्ग-2 (NH-2) बंद…

Read More

आधी आदित्य धर यांना चोर म्हटले, आता माफी मागितली:धुरंधर 2 ची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केला होता, मानहानी खटल्यात कोर्टाचा दिग्दर्शकाच्या बाजूने निकाल

धुरंधर 2 च्या स्क्रिप्ट चोरीचा वाद आता संपला आहे. मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर, आदित्य धरवर स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप करणाऱ्या संतोष कुमारने आता माफी मागितली आहे. एप्रिलमध्ये त्यांनी दावा केला होता की आदित्य धरने त्यांची लिहिलेली स्क्रिप्ट चोरून चित्रपट बनवला. 30 मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संतोष कुमारने आदित्य धरला चोर म्हटले आणि स्क्रिप्ट चोरीचा आरोप…

Read More

विजय यांनी 24 तासांत ज्योतिषाला OSD पदावरून हटवले:सहयोगी-विरोधकांनी विरोध केला होता; अभिनेत्याच्या CM बनण्याची भविष्यवाणी केली होती

तामिळनाडूमध्ये फ्लोअर टेस्ट पास केल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषी राधन पंडित यांना विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) पदावरून हटवले. विजय यांनी त्यांना पदावरून हटवण्याच्या २४ तास आधीच ही जबाबदारी दिली होती, परंतु विरोधक आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. राधन हे दीर्घकाळापासून विजय यांचे जवळचे मानले जातात. त्यांनी विजय मुख्यमंत्री होतील…

Read More

आरोग्य विभागाच्या बदल्या समुपदेशनाद्वारे:गट-ब, गट-क, गट-ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत येणार सुसूत्रता, वेळापत्रक जाहीर

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि त्यात सुसूत्रता आणण्यात भर देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय…

Read More

सखोल अभ्यासाअभावी ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित:‘इतिहासातील भुतावळ’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मोडी लिपी तज्ज्ञांचे मत

सखोल अभ्यासाअभावी आजही हजारो ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित आहेत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक आणि मोडी लिपी तज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी व्यक्त केले. इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांच्या ‘इतिहासातील भुतावळ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तो चारही बाजूंनी पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज सखोल अभ्यासाची तयारी…

Read More

अजित दादा म्हणाले होते आपण पुन्हा एकत्र येणार:आमदार संदीप क्षीरसागरांच्या वक्तव्याची चर्चा; बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये संघर्ष उफाळला

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये सुरू असलेला वाद आता उघडपणे समोर आला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नाराजी व्यक्त केली. आपल्या मतदारसंघातील विकासकामांबाबत आयोजित बैठकीला आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे तर या प्रकरणात आपण हक्कभंग दाखल करू शकतो, असेही…

Read More

घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी लाच:सवना येथील ग्रामसेवकास अडीच हजार घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ता. १३ दुपारी गोरेगाव चौफुली येथे रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते….

Read More