MVA चे विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर मतैक्य:काँग्रेस 8, ठाकरे 4, शरद पवार गट 3 जागा लढवणार; नांदेड, नाशिकवर तिढा
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा बव्हंशी सोडवण्यात यश मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माहितीनुसार, 17 पैकी तब्बल 15 जागांवर आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाले. त्यात काँग्रेसने 8, उद्धव ठाकरे गटाने 4, तर शरद पवार गटाने 3 जागांवर दावा केला आहे. उर्वरित 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी,…