Headlines

मनमाडला गुणवंतांमध्ये मुलींनी राखले वर्चस्व:केंद्राचा निकाल 90 तर शहरातील सहा विद्यालयांचा निकाल 100 टक्के; पूजा कुशवाह केंद्रात प्रथम‎

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाईन जाहीर झाला असून मनमाड केंद्राचा एकूण निकाल ९० टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी उल्लेखनीय यश मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारली . सेंट झेवियर्स हायस्कूलमधील पूजा मुकुंद कुशवाह हिने ९६.२० टक्के गुण मिळवत केंद्रात अव्वल स्थान पटकावले. के. आर. टी….

Read More

कळवणमध्ये जनगणना प्रशिक्षण पूर्ण; कर्मचारी फिल्ड वर्कसाठी सज्ज:41 प्रशिक्षणार्थींचा सहभाग; अचूक माहिती संकलनावर समन्वयकांचा भर‎

भारत सरकारच्या आगामी जनगणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर कळवण नगरपंचायतीअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक व प्रगणकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. ५, ६ आणि ७ मे या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणानंतर आता संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष जनगणना कार्यासाठी सज्ज झाले आहेत. या प्रशिक्षण सत्रात फिल्ड ट्रेनर यांनी जनगणनेची कार्यपद्धती, माहिती संकलन प्रक्रिया, ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर…

Read More

सुवेंदु आज बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, PM उपस्थित राहणार:कोलकाता परेड ग्राउंडमध्ये 1 लाख लोक येतील; वॉटरप्रूफ तंबू, झालमुडी स्टॉल; सुरक्षेसाठी 4000 जवान

सुवेंदु अधिकारी आज दुपारी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधी सोहळा कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित केला जाईल. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक मोठे नेते उपस्थित राहतील. शुक्रवारी कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित आमदार दलाच्या बैठकीत सुवेंदु यांची नेतेपदी निवड करण्यात आली. बैठकीनंतर अमित शहा यांनी त्यांच्या…

Read More

संबळाच्या ठेक्यात देवी-म्हसोबाची सोंगे काढून आखाडी उत्सवाची सांगता:चांदवडच्या आखाडी उत्सवात घडले लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन

येथील गाडगेबाबा चौक (बहादूरपुरा) येथे श्री संत गाडगेबाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आखाडी (देवी उत्सव) उत्सवात उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली देवीमाता व म्हसोबा महाराज ही मानाची सोंगे काढून शुक्रवारी (दि. ८) पहाटे आखाडी उत्सवाची उत्साहात सांगता झाली . ऐतिहासीक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे. शहरातील गाडगेबाबा चौक येथे…

Read More

सिल्लोड तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचा समारोप:आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती, सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

राज्य शासनाने राबविलेल्या महाराजस्व अभियान टप्पा – १ चा समारोप आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांचे काम करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्वांवर काम करावे. नागरिकांची उर्वरित प्रलंबित प्रकरणे…

Read More

शासन आपल्या दारी:महसुली समस्या‎एका छताखाली सोडविण्याचा उपक्रम‎, खुलताबादला प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

खुलताबाद शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच महसुली प्रश्नांचे एका छताखाली तात्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी केले. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांना विविध शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचेही…

Read More

शीना बोरा हत्या प्रकरण:इंद्राणी मुखर्जीचा परदेशवारीचा अर्ज कोर्टाने फेटाळला, इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता; सरकारी वकिलांचा युक्तिवाद

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला स्पेन आणि ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यास येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी नमूद केले की, खटल्यातील मोजक्याच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असून खटला आता अंतिम…

Read More

‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट आधार, मतदान कार्डचा वापर:जन्म दाखला मोकभनगीचा, आधार कार्ड मानूरचे

मानूर येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी ४० पालकांनी बोगस कागदपत्रे आणि संशयास्पद भाडेकरारांच्या आधारे अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. पंचायत समितीत प्रवेश पडताळणीदरम्यान मोकभनगी येथील एका पालकाने या योजनेचा लाभ घेताना मानूर गावात राहत असल्याचे बनावट मतदार ओळखपत्र, आधार कार्ड व उत्पन्नाचा दाखला तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे…

Read More

मावेजा घोटाळा:154 पैकी 6 फाइल्स गहाळ; पाठक यांना 7 दिवसांची कोठडी, अधिकारांचा गैरवापर केल्याने पाठक यांना 50 हजार दंड

241 कोटींचा मावेजा घोटाळ्यात विशेष पथकाने अटक केलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना शुक्रवारी बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाने त्याला विरोध केला. न्यायालयाने 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणातील 154 पैकी 6 फाइल्स मिसिंग असल्याचे पोलिसांनी न्यायालयात वेगळी आहेत. हे…

Read More

गायरान जमीन लाटणाऱ्या 7 ग्रामसेवक,8 सरपंचांसह 40 जणांवर गुन्ह्याचे आदेश:पारोळा तालुक्यातील प्रकार; जिल्हाधिकाऱ्याच्या चौकशीतून उघड

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका सामान्य माणसाने व्यवस्थेविरुद्ध दिलेला साडेचार वर्षांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांनी धमक्या आणि स्वतःवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांना न जुमानता पिंपरी मोंढाळे येथील दोन . पिंपरी मोंढाळे येथील गट क्र. १४० आणि सर्व्हे क्र. ८४ मधील सरकारी गायरान जमीन हडपण्यासाठी हा सर्व प्रकार घडला. जेव्हा…

Read More