Headlines

काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदारांना बिल दिल्यास कारवाईचा इशारा:लोहाऱ्यात जलजीवन योजनेच्या बिलांवर अध्यक्षा अर्चना पाटील यांचा इशारा‎

जलजीवन योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदाराला बिल अदा केले तर मी संबंधितांवर कारवाई करेन, अशी ताकीद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. लोहारा येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ७) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपुरवठा योजना, घरकुल,…

Read More

पंढरपुरमधील गोशाळेसाठी जागा देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध:गोशाळेतील दूध, तूप विठ्ठल रुक्मिणीच्या नैवेद्यासाठी वापरले जाते‎

ऐतिहासिक यमाई तलावाची सुमारे ३.१२ हेक्टर जागा गोशाळेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीच कडाडून विरोध केला आहे. ही जागा मंदिर समितीला दिल्यास शहराचे एकमेव विरंगुळा केंद्र धोक्यात येईल, असा दावा करत ‘ यमाई तलाव बचाव समिती’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला…

Read More

मोहोळच्या विकासाला मुंबईतून ग्रीन सिग्नल:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा; आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश‎

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार राजू खरे यांनी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार खरे यांनी मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आमदार खरे यांनी सुचवलेल्या दोन महत्त्वाच्या विकासकामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. यामुळे मतदारसंघातील विकासकामांना…

Read More

राजा रघुवंशी हत्याकांडामधील 4 आरोपींचा जामीन फेटाळला:सोनमच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान; मेघालय सरकारने म्हटले- पोलीस तपासात चूक नाही

मध्य प्रदेशातील इंदूरमधील बहुचर्चित राजा रघुवंशी हत्याकांडात आरोपींच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. शिलाँग सत्र न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुशवाहसह चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. तर, मेघालय सरकारने आरोपी सोनम रघुवंशीला मिळालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. राज कुशवाहसह 4 आरोपींना दिलासा नाही शिलाँग…

Read More

रासायनिक खतांच्या महागाईने शेतकरी पोळला:शेणखताच्या किंमतीमध्ये वाढ, खतांच्या किमतीत 500 रुपयांची वाढ, बळीराजा पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळला‎

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मोहोळच्या शिवारापर्यंत उमटू लागले आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ रासायनिक खतांचा तुटवडा आणि गगनला भिडलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या महागाईने जगाच्या पोशिंद्याला जेर . जागतिक युद्धाच्या सावटाने कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. युरिया, १०:२६ आणि १८:४६ सारख्या प्रमुख खतांच्या किमतीत पोत्यामागे ४०० ते ५००…

Read More

नसरापूर अत्याचार प्रकरण; नराधमास फासावर लटकवा:राहुरीतील ब्राम्हण संघटना व नागरिकांचे प्रशासनाला निवेदन‎

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी राहुरीतील ब्राह्मण संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत, दोषीला लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि तहसीलदार डॉ….

Read More

मिरजगावात बेशिस्त पार्किंगचा विळखा:पादचाऱ्यांचा जीव टांगणीला‎, नागरी हक्क, सुरक्षिततेचा प्रश्न; कायमस्वरूपी नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची गरज

मिरजगाव येथे मुख्य रस्त्यावर अशी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर वाहने उभी केल्यास तत्काळ दंड आकारला जावा. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने निर्ढावलेली भूमिका सोडून रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अतिरिक्त अडथळे दूर करून…

Read More

तामिळनाडूमध्ये विजयच्या सरकारवर सस्पेन्स:DMK चे आमदार 10 मे पर्यंत चेन्नईत राहतील, आसाममध्ये 12 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी

तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून रस्सीखेच सुरू आहे. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी गुरुवारी पुन्हा एकदा टीव्हीके प्रमुख विजय यांच्या सरकार स्थापनेच्या दाव्याला फेटाळून लावले. त्यांना सांगितले की, त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांच्या सह्या घेऊनच परत यावे. मात्र, राज्यपालांनी विजय यांना आश्वासन दिले आहे की, ते इतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणार नाहीत. दरम्यान, टीव्हीकेने संख्याबळ…

Read More

भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले….

Read More

नकारात्मकता सोडा अन् आत्मविश्वासाने प्रगती साधा:हिवरेझरे येथील कार्यक्रमात उपस्थितांना व्याख्याते गणेश शिंदेंकडून यशाचा कानमंत्र

“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ कष्ट उपसून चालणार नाही, तर तुमच्याकडे कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि अढळ आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. ज्यावेळी कर्मचारी संस्थेला स्वतःचे कुटुंब मानून काम करतो, तेव्हा त्या संस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही,” असे प्रेरणादायी उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी काढले. विंटेज हिल्स रिसॉर्ट (हिवरेझरे) येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आणि चैतन्य…

Read More