Headlines

विदर्भात उष्णतेची लाट कायम:चंद्रपूर आणि वर्ध्यात हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

राज्याच्या काही भागांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट अद्यापही कायम असल्याने नागरिक उन्हाच्या कडाक्याने प्रचंड हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळी लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच भीषण तापमानाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने…

Read More

सावरकर जयंतीनिमित्त पुण्यात अभिवादन कार्यक्रम:‘भारतरत्न’ सन्मानासाठी केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आणि सीए सर्वेश मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव…

Read More

पुण्यातून तरुणाचे अपहरण, जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी कट:लोणीकंद पोलिसांनी 300 किमी पाठलाग करत 7 आरोपींना अटक केली

पुण्यातून एका २९ वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी अपहरण करण्यात आले होते. लोणीकंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३०० किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून या तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार महिलेसह सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित तरुणाचे नाव निलेश लक्ष्मण बोड्रे…

Read More

सोलापूरमधील शिवसेना-भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर!:पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी केली तर खपवून घेणार नाही- उदय सामंत

शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला दमबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अशा धमक्यांनी शिवसेना कधीही नामोहरम होणार नाही, असा सणसणीत टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मित्रपक्षाला…

Read More

सीतेशिवाय रामराज्याची कल्पना अपूर्ण: भैय्याजी जोशी:एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन

विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी यांनी नुकतेच पुण्यात ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले की, सीतेशिवाय रामराज्याची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. एमआयटी डब्ल्यूपीयू येथे हा कार्यक्रम पार पडला. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या…

Read More

मराठी रंगभूमीला कलात्मकतेची नवी दिशा हवी:श्रीराम लागू नाट्य महोत्सवातील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडले विचार

मराठी रंगभूमी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, मानवी जीवनाचे सखोल आकलन करून घेणारी आणि नव्या काळातील आव्हाने पेलणारी कलात्मक दिशा घ्यावी, असा सूर एका परिसंवादात उमटला. श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवांतर्गत ‘मराठी रंगभूमी – काल, आज, उद्या’ या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित पहिल्या श्रीराम…

Read More

नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; 25 किलो RDX जप्त:'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या शस्त्रनिर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत २७ मे रोजी गडचिरोली आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त केला. यात इन्सास रायफल्स, १२ बोअर रायफल्स आणि २५ किलो आरडीएक्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे…

Read More

श्रद्धा कपूरचा मायकल जॅक्सनच्या गाण्यावर मजेदार डान्स:कथित प्रियकराला टॅग करून लिहिले- असा कोणीतरी शोधा जो तुमचा असा डान्स काढू शकेल

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकताच इंस्टाग्रामवर तिचा एक मजेदार डान्स व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये ती पजामा घालून डान्स करताना दिसली. श्रद्धाने मायकल जॅक्सनच्या ‘बॅड’ गाण्यावर डान्स केला. ज्यात तिचे मजेदार आणि उत्साही डान्स मूव्ह्स दिसत आहेत. मात्र, व्हिडिओसोबतच तिच्या कॅप्शननेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीला टॅग करत तिने लिहिले, ‘असा कोणीतरी…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

2024-25 मध्ये 36 प्रादेशिक राजकीय पक्षांचे उत्पन्न 52% घटले:21 पक्षांनी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला, ADR चा अहवाल

2024-25 मध्ये 36 प्रादेशिक राजकीय पक्षांच्या एकूण उत्पन्नात 51.57% घट नोंदवली गेली आहे. या पक्षांचे एकूण उत्पन्न 1,192.94 कोटी रुपये होते, तर 2023-24 मध्ये ते 2,463.17 कोटी रुपये होते. म्हणजेच, एका वर्षात 1,270.23 कोटी रुपयांची घट झाली. नवी दिल्लीत जारी केलेल्या ADR च्या अहवालानुसार, 36 पैकी 21 प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला….

Read More