फुबगाव येथील ३४ बाधित कुटुंबांचा १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा:पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले, प्रशासनाकडे केली मागणी
चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव-सैदापूर येथील ३४ बाधित कुटुंबांनी १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. १९ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथे दरड कोसळली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई व मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन…