भोगावती नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे, पाइप मोडून नदीपात्रात फेकले:अतिवृष्टीनंतर बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू सांडल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका
मोहोळ तालुक्यातील नरखेड भागातून वाहणाऱ्या डिकसळ येथील भोगावती नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरील संरक्षक कठडे व पाईप मोडून नदीपात्रात फेकून दिले गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. . मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून भोगावती नदी वाहत आहे. या नदीवर देगाव, डिकसळ, भोयरे या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यावरून…