दर्यापूर येथील अतिक्रमित सुरक्षा भिंतीसह जिना हटवला:जयस्तंभ चौकातील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या काही भागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमित जागांवर उभारण्यात आलेले जीने, पॅसेज, सुरक्षा भिंत तसेच इतर बांधकामांवर बुलडोझर चालवून नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. शहरात काही ठिकाणी अतिक्रमीत जागेवर बांधकाम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यापूर्वी…