परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी शिंदेसेनेचा दावा कायम:विप्लव बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी महायुतीकडून शिंदेसेनेने आपला दावा कायम ठेवला असून महायुतीकडून पुन्हा एकदा माजी आमदार विप्लव बाजोरीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. तर खासदार श्रीकांत शिंदे गुरुवारी ता. ३० हिंगोलीत येणार असून यावेळी ते काही पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीकडून शिंदेसेनेकडे आहे. या विधान परिषदेसाठी…