सावंतवाडी स्टेशनला मधु दंडवते यांचे नाव, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय:कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनाही मुदतवाढ; कोकण, नागपूर, डोंबिवलीसाठी महत्त्वाच्या घोषणा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत याबाबत माहिती देण्यात आली. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याचा मोठा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंत्रिमंडळाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस, असे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. कोकणातील…