ठाकरे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर!:नार्वेकर कोण लागून गेला? भास्कर जाधवांचा संताप; मिलिंद नार्वेकरांचाही खोचक टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांदरम्यान आता पक्षातील अंतर्गत मतभेदही उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे ठाकरे गटातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव माध्यमांशी संवाद साधत असताना मिलिंद नार्वेकर…