परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी:1 कोटी 86 लाखांचा मुद्देमाल जप्त; मुंबई व सातारा भरारी पथकाची कारवाई
गोवा राज्यातील विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा प्रचंड साठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) आणि भरारी पथक (सातारा) यांनी सातारा-लोणंद रोडवर संयुक्त सापळा रचून तब्बल १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक…