Headlines

धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला मारहाण केल्याने सुरंगळीत आत्महत्या:अपमान सहन न झाल्याने विष प्राशन करून संपवले जीवन‎

सासुरवाडीत झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील संतोष गोविंद चंडोल (२८) या युवकाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे घडली. याप्रकरणी भोकरदन प . भोकरदन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष चंडोल हे ४ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नी सोनालीसोबत सासरी…

Read More

गांगुली म्हणाले- मी युसूफ पठाण यांना खासदारकी सोडायला सांगितले नाही:ममता बॅनर्जींनी माझ्यामार्फत कोणताही राजकीय संदेश पाठवला नाही

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, मी ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही. ते म्हणाले की, माध्यमांनी अशा अफवांवर आणि अंदाजांवर विश्वास ठेवू नये. 4 जून रोजी बंगालमधील ‘आनंदबाजार पत्रिका’ या वृत्तपत्राने दावा केला होता की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सौरवला सांगितले आहे…

Read More

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा:नाशिकमधील 'राष्ट्रवादी' भवनात रंगला कार्यक्रम

महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. शहराध्यक्ष रंजन…

Read More

Nepal Uses China Cameras On Indian Border; 10KM Range Surveillance

भक्तदर्शन पांडे | पिथौरागढ23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेवर नेपाळने चीननिर्मित थर्मल कॅमेरे बसवायला सुरुवात केली आहे. हे कॅमेरे भारतीय सीमेच्या आत सुमारे 10 किलोमीटरपर्यंतच्या हालचाली रेकॉर्ड करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही, तर या कॅमेऱ्यांच्या कार्यान्वयनासाठी चीनच्या इंटरनेट नेटवर्कचा वापर होत असल्याची बाबही समोर आली आहे. अशा परिस्थितीत,…

Read More

कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ – हे प्रतिष्ठेचे प्रतीक

प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’… हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच पर्यटक पोहोचतो. येथे आलिशान हॉटेल्स किंवा मोठी पर्यटन स्थळे नाहीत. राजधानी फुनाफुटीमध्ये हवाई पट्टीच संध्याकाळी पिकनिक स्पॉट आणि फुटबॉल ग्राउंड बनते. पण अमेरिकेच्या टेड निम्ससाठी हे काही सामान्य ठिकाण नव्हते. जेव्हा त्यांनी…

Read More

चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला:सर्व्हर हॅक; डेटा केला लॉक, अनलॉक करण्यासाठी बिटकॉइनमध्ये मागितली खंडणी

चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय आणि प्रशासकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक सायबर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. येथील नामांकित ‘चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन’च्या मुख्य सर्व्हरवर अज्ञात हॅकर्सनी मोठा सायबर हल्ला केला आहे. रुग्णालयाचा अत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय डिजिटल डेटा लॉक करून, तो पुन्हा मिळवून देण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी चक्क १.२३४५६ बिटकॉइनची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी रामनगर…

Read More

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन करावे लागणार:झीज होत असल्याचा पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल, पुढील आठवड्यात पाहणी करून अंतिम निर्णय

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तींचे स्वरूप बदलू नये, तसेच संवर्धनाची प्रक्रिया दीर्घकाळ टिकावी, यासाठी पुरातत्त्व तज्ज्ञांकडून मूर्तींची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत हे संवर्धन कार्य केले जाईल . श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

Read More

पेट्रोल पंपांवरून ‘बल्क’ खरेदीला चाप:इंधन गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता होणार कारवाई, इंधन तुटवड्याचे निमित्त करून काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले

जागतिक घडामोडींमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासवून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. आता औद्योगिक आणि घाऊक ग्राहकांना पेट्रोल पंपावरून थेट इंधन खरेदी करता येणार नाही. अन्न, ना . मे २०२६ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोलच्या मागणीत १८.५४% तर डिझेलच्या मागणीत २२.३% वाढ झाली आहे. मात्र, बल्क डिझेलची…

Read More

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट- 'जे काही करायचं आहे ते करून घ्या'

टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये कबूल केले होते की, तिने ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही शोच्या निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले होते. या वक्तव्यानंतर असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात…

Read More

बॅलेट पेपर नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकावा:राज ठाकरेंची सूचना, उबाठासह सुप्रिया सुळेंचाही पाठिंबा; 8 जूनला दिल्लीत खलबते

राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आता ‘ईव्हीएम’ विरुद्ध ‘बॅलेट पेपर’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला असून, या भूमिकेला आता महाविकास आघाडीतूनही मोठे बळ मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Read More